अहमदनगर : नेवासा तालुक्यातील अतिदृष्टीमुळे तुर, सोयाबीन, कपाशी यासह इतर पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत ( Farmers are in trouble due to loss ) आहे. नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यासाठी एकरी 400 रुपयांची मागणी केल्याचा व्हिडिओ व ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलाचे व्हायरल होत आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे लेखी तक्रार निवेदनाद्वारे केली ( Complaint made through written statement ) आहे. नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती चिलेखनवाडी व देवसडे येथील पिकांचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून एकरी 400 रुपयांची मागणी होत असल्याची तक्रार शिवसेनेच्या शिंदे गटच्यावतीने तहसीलदार यांचेकडे करण्यात आली आहे.
एकरी 200 ते 400 रुपयांची मागणी : याबाबत दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले की, नेवासा तालुक्यातील सध्या कृषि विभागामार्फत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरु झाले आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करण्याकरिता शासनाचे अधिकृत अधिकारी शेतात न जाता गावातील खाजगी लोकांना एजंट शेतकऱ्यांकडे पंचनाम्यासाठी पाठवीत आहेत. हे खासगी लोक शेतकऱ्यांकडे पंचनामा करण्यासाठी एकरी 200 ते 400 रुपयांची मागणी करत आहेत. त्याशिवाय पंचनामे करत नाहीत. त्या संबधीत पैसे मागणाऱ्या व्यक्तींचा शेतकऱ्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला तर अरेरावाची भाषा करतात. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी तसेच शेतकऱ्यांकडून अनधिकृतपणे पैसे जमा करणाऱ्या व्यक्ती कर्मचारी अधिकारी यांची चौकशी करुन संबधीतांवर कारवाई करुन निलंबन करावे या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.