अहमदनगर (शेवगाव) - अर्बन बँकेचे शेवगाव शाखेचे शाखाधिकारी यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (वय 58, रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना मंगळवार (दि. 27) रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने शेवगाव तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
शिंदे 31 मे 2021 ला निवृत्त झाले होते
मृत गोरक्षनाथ शिंदे यांच्या खिशामध्ये आत्महत्येपुर्वी लिहहिलेली एक चिठ्ठी आढळली आहे. मात्र, या चिठ्ठीत काय लिहिले याबाबत समजू शकलेले नाही. गोरक्षनाथ शिंदे हे नगर अर्बन बँक शेवगाव शाखेतू व्यवस्थापक म्हणून दि. 31 मे 2021 रोजी सेवा निवृत्त झाले होते. मात्र, बँक प्रशासनाने त्यांचा सेवाकाळ तीन महिण्यासाठी वाढवून दिला होता.
चिठ्ठीमध्ये काय मचकूर आहे, ते समजू शकले नाही
आज मंगळवार दि. 27 रोजी सकाळपासून गोरक्षनाथ शिंदे हे घरातून बाहेर पडले होते. सकाळपासून ते घरी न आल्यामुळे त्यांच्या घरच्यांनी त्यांचा शोध घेतला असता, दुपारी 3.30 वाजेच्या दरम्यान शेतामध्ये त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. या घटनेप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिंदे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये काय मचकूर आहे, ते समजू शकले नाही. यामुळे चिठ्ठीत कोणाचे नाव आहे? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, याबाबत पोलिसांकडून मौन पाळले जात आहे.