ETV Bharat / state

Gold Donation To Saibaba : साईमंदिराचा कलश आतूनही सुवर्णमय, हैदराबादच्या साईभक्तानं पुन्हा दिलंय भरीव सुवर्णदान

Gold Donation To Saibaba : शिर्डी साईबाबा मंदिराच्या कलशाला सुवर्णमय करणाऱ्या हैदराबाद येथील साईभक्तानं आता पुन्हा कलशाच्या आतील बाजूलाही सुवर्ण मुलामा दिलाय. हैदराबाद येथील विजय कुमार या साईभक्तानं याआधीही साईमंदिराच्या कलशालासह मंदिर परिसरातील सर्व मंदिराचे कलश सुवर्णलेपन केले होते. त्यांनी आता पुन्हा मंदिराच्या कलशाच्या आतील बाजूला सुवर्ण मुलामा करत आपली अनोखी भक्ती साई चरणी अर्पण केलीय.

Gold Donation To Saibaba
साईचरणी सुवर्ण दान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2023, 6:41 PM IST

Updated : Sep 27, 2023, 2:06 PM IST

साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

अहमदनगर Gold Donation To Saibaba : शिर्डीच्या साईबाबांचे देश विदेशात लाखो भक्त आहेत. प्रत्येक भक्त आपआपल्या परीनं साईचरणी दान चढवत असतो. मात्र, साई मंदिराच्या इतिहासात सुवर्ण कलशासह साईंना सोन्याचे सिंहासन दाक्षिणात्य भाविकांनी दान केलंय. त्यापैकीच एक भक्त असलेल्या हैदराबाद येथील विजय कुमार यांनी सन 2007 मध्‍ये समाधी मंदिरावरील कळस व त्‍याभोवती असलेले चार गोपूर यांनाही सुवर्ण मुलामा देण्‍याचं काम देणगी स्‍वरुपात केलंय. यावर आता पुन्‍हा एक थर सुवर्ण वज्रलेप करण्‍याचं कामही करण्‍यात आलंय. याचबरोबर आता विजयकुमार यांनी साई समाधीच्या कलशाच्या आतील बाजूलाही सोन्याचा मुलामा दिलाय.

मंदिराच्या कळसांना सुवर्ण मुलामा देण्‍याचं काम : यापूर्वी सन 2006 मध्ये साईबाबांच्या समाधी मंदिरातील सोन्‍याच्‍या पादुका, सोन्‍याची झारी व फुलपात्र, सन 2008 मध्ये सोन्‍याची चिलीम, सन 2010 मध्ये गुरुस्‍थान मं‍दिराच्या बाहेरील बाजूस सुवर्ण मुलामा तसंच सन 2015 मध्ये साई मंदिर परिसरातील शनि मंदिर, गणपती मंदिर व महादेव मंदिर या तीनही मंदिराच्या कळसांना सुवर्ण मुलामा देण्‍याचं काम देणगीदार विजय कुमार यांचे देणगीतून केलंय. त्याचबरोबरीनं मार्च 2023 मध्ये साईबाबांचे चावडीतील दोन चांदीचे सिंहासन, नंदादीप, व्‍दारकामाईचे चांदीचे सिंहासन व समाधी मंदिरातील सिंहासन यांना देखील सुवर्ण मुलामा देण्‍याचं काम त्यांच्या देणगीतून झालंय, अशी माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी दिलीय. (Saibaba temple)

साईबाबांची मूर्ती व विभुती देऊन सत्‍कार : हैदराबाद येथील साईभक्त विजय कुमार यांचा साईमंदिर सुवर्णमय करण्यात मोठा वाटा आहे. साईबाबा संस्‍थानच्‍या वतीनं संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी त्यांचा साईबाबांची मूर्ती व विभुती देऊन आज सत्‍कार केला. दरम्यान देणगीदार साईभक्त विजयकुमार यांनी साई मंदिराच्या कलशाला सुवर्ण मुलामा देण्यासाठी किती खर्च आला, याबाबत बोलण्यास नकार दिलाय. ते म्हणाले की, जे काही आहे ते बाबांचं आहे आणि ते आज बाबांना परत दिलंय.

हेही वाचा :

  1. Sai Temple Donation : रामनवमी उत्सव काळात साईचरणी तब्बल 4 कोटींची देणगी; लाखो भक्तांनी घेतले दर्शन
  2. Sri Shirdi Sai Baba Mandir : तीन दिवसात साईचरणी सात कोटींचे दान; मागील वर्षाच्या तुलनेत तीन कोटींची वाढ
  3. Shirdi Saibaba Silver Donation: जम्मू-कश्मीरच्या भक्ताने साईचरणी दिले 'हे' महत्त्वाचे दान; जाणून घ्या सविस्तर

Last Updated : Sep 27, 2023, 2:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.