ETV Bharat / state

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार, प्रवरा नदीपात्र परिसरातील घटना

गोरक्षनाथ थोरात यांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने झडप घालून तिला ठार केले. याशिवाय गोठ्यातील पाच महिन्यांच्या वासरावरही बिबट्याने हल्ला करत त्याला जखमी केले. हल्ल्यात जखमी वासराची प्रकृती सध्या चिंताजनक असून प्रथोमपचार करण्यात आले आहेत.

author img

By

Published : Jun 15, 2020, 3:35 PM IST

leopard attack on animals
प्राण्यांवर बिबट्याचा हल्ला

अहमदनगर - रविवारी रात्री जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. काही वेळाने पावसाने विश्रांती घेतली. यावेळी श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगावमधील वाकण वस्तीवर बिबट्याने चांगलाच धुमाकुळ घातला. गोरक्षनाथ थोरात यांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने झडप घालून तिला ठार केले.

याशिवाय गोठ्यातील पाच महिन्यांच्या वासरावरही बिबट्याने हल्ला करत त्याला जखमी केले. हल्ल्यात जखमी वासराची प्रकृती सध्या चिंताजनक असून प्रथोमपचार करण्यात आले आहेत. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र, हे अधिकारी अद्यापही घटनास्थळी दाखल झाले नाही. दरम्यान, सदरच्या घटनेमुळे परिसरातील नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत. वनाविभागाने परिसरात नवीन पिंजरे लावावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.