ETV Bharat / state

'त्याने' कागदावरच रेखाटली मोत्यांची आरास, अन् पटकावले पहिले बक्षीस - गणराज म्हसे हस्ताक्षर न्यूज

गणराजच्या हस्ताक्षरावर शिक्षक राजू बनसोडे यांचे लक्ष गेले. गणराजच्या हस्ताक्षरावर आणखी काम केल्यास ते सुलेखन ठरू शकेल, असा विश्वास त्यांना वाटला. जिल्हास्तरीय सुलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून गणराजने हा विश्वास खरा करून दाखवला.

गणराज म्हसे
गणराज म्हसे
author img

By

Published : Feb 8, 2020, 7:54 PM IST

Updated : Feb 9, 2020, 2:36 PM IST

अहमदनगर - काही दिवसांपासून सुलेखन स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या श्रेया सजन या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तिच्या सुलेखनाचे नेटीझन्स आणि मंत्र्यांनीही कौतुक केले. श्रेयाच्या यशाबद्दल तिचे कौतुक करायलाच हवे, मात्र याच स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवलेला विद्यार्थी दुर्लक्षित राहिला. गणराज म्हसे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. गणराज राहाता तालुक्यातील वाकडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिकतो. जिल्हा स्तरावर झालेल्या सुलेखन स्पर्धेत त्याने पहिला क्रमांक मिळवला आहे.

'त्याने' कागदावरच रेखाटली मोत्यांची आरास

गणराजच्या वडिलांना पक्षाघात झाल्याने ते कुटुंबाच्या निर्वाहाची जबाबदारी पार पाडू शकत नाहीत. त्यामुळे मुलांचे शिक्षण, घरखर्च, पतीचा दवाखाना याचा आर्थिक भार त्याची आई वनिता यांच्यावर आहे. त्यामुळे वनिता या श्रीरामपूर एमआयडीसीमधील एका फर्निचर मॉलमध्ये काम करतात.

हेही वाचा - 'इंद्रायणी स्वच्छ करण्याची जबाबदारी माझी'

गणराजच्या हस्ताक्षरावर शिक्षक राजू बनसोडे यांचे लक्ष गेले. गणराजच्या हस्ताक्षरावर आणखी काम केल्यास ते सुलेखन ठरू शकेल, असा विश्वास त्यांना वाटला. म्हणून त्यांनी आपल्या शिक्षक मित्रांच्या मदतीने कॅलिग्राफीसंदर्भात ज्ञान मिळवले. त्यानंतर त्यांनी गणराजचा सराव घेतला. दोन ते तीन वर्षांच्या तयारीनंतर गणराज हस्ताक्षर स्पर्धेत केंद्रात, तालुक्यात आणि चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात पहिला आला. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून आई आणि शिक्षकांनी गणराजवर दाखवलेला विश्वास त्याने खरा करून दाखवला.

Intro:

ANCHOR_ वडील पक्षाघाताने अंथरुणाला खिळलेले घरी कमावती फक्त आई अशा अडचणीत शिकत असलेला गणराज म्हसे हस्ताक्षर स्पर्धत जिल्ह्यात पहिला आलाय...त्याचे हस्ताक्षर सुंदर हस्ताक्षर होऊ शकते ही वाट त्याला त्याच्या वर्गशिक्षकांनी दाखविली त्या वाटेनेजात संसार चालविण्यासाठी आई अहोरात्र उपसत असलेल्या कष्टाची जाणीव त्याने ठेवत सुंदर हस्ताक्षरासाठी रात्रीचा दिवस करणारा राहाता तालुक्यातील वाकडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीतील विद्यार्थी गणराज म्हसे हस्ताक्षर स्पर्धत आज जिल्ह्यात पहिला आलाय....

VO_ गणराजचे वडील राजेंद्रकुमार पक्षाघाताने आजारी असल्याने त्यांना चालणे आणि बोलणेसुद्धा शक्य नाही. त्यामुळे मुलांचे शिक्षण, घरखर्च, पतीचा दवाखाना हा सर्व आर्थिक भार त्याची आई वनिता यांच्यावर आला. वनिता यांनी परिस्थितीपुढे रडण्यापेक्षा लढण्याचे ठरविले. श्रीरामपूर एम.आय.डी.सी.तील एका फर्निचर मॉलमध्ये नोकरी पत्करली. नोकरी करून घरकाम, पतीचे आजारपण, मुलांचे शिक्षण हा संसाराचा गाडा हाकताना आईचे होणारे हाल चिमुकला गणराज पाहात होता. गणराज इयत्ता तिसरीत गेल्यावर त्याच्या हस्ताक्षरावर शिक्षक राजू बनसोडे यांची नजर पडली.गणराजच्या हस्ताक्षरावर आणखी काम केल्यास ते सुलेखन ठरू शकेल, असा विश्वास त्यांना वाटला. म्हणून त्यांनी गणराजचे हस्ताक्षर सुधारण्याचे ठरविले. कॅलिग्राफीसंदर्भात बनसोडे यांना तितकेसे सखोल नॉलेज नव्हते. यासाठी ते स्वतः आधी अपडेट झाले. याकामी त्यांना गोरक्षनाथ सजन, मिलाद बनसोडे, संजय राठोड, विलास बनसोडे, जयेश याने होलस गायकवाड, हस्ताक्षरतज्ज्ञ अमित भारकडे, एस.एम.कोकाटे यांची मदत घेतली..बनसोडे यांनी सुलेखनाचे ज्ञान मिळविल्यावर गणराजचा सराव सुरू केला. गणराजचे अक्षर तिरपे होते. ते आडव्या-उभ्या रेषांचा सराव करून सरळ केले. अक्षरांच्या मोतीदार वळणासाठी अंकलिपीतील फाँट पाहून सराव में घेतला. सुलेखनातील गणराजची प्रगती घरी त्याच्या आईला जाणीवपूर्वक सांगितली. त्यामुळे आई वनिता यांनीही सुलेखनाचा घरी दिलेला होमवर्क वेळात वेळ काढून जातीने करून घेतला. पावनेदोन वर्षांच्या तयारीनंतर गणराज हस्ताक्षर स्पर्धेत केंद्रात, तालुक्यात आणि चार दिवसांपूर्वी थेट जिल्ह्यात पहिला आलाय...आई व शिक्षक यांनी गणराजवर दाखविलेला विश्वास व त्याच्यासाठी घेतलेल्या खस्ता याचे त्याने स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून चिज केले', अशी भावना आई वनिता म्हसे यांनी व्यक्त केलीय....

BITE_ वनिता म्हसे ( गणराज ची आई )

BITE_ राजू बनसोडे ( गणराज चे शिक्षक )

VO_ आज इंग्लिश मीडियमच्या जमान्यातही पालकांची परिस्थिती नसताना विद्यार्थी घडविण्यासाठी धडपड करत असलेले शिक्षक बनसोडे वडिलांपेक्षा शिक्षकाचे कर्तव्य मोठे...गणराजचे वर्गशिक्षक बनसोडे यांचा मुलगाही त्याच्याच वर्गात शिकतो. बनसोडे यांनी ठरविले असते, तर स्वतःच्या मुलाचा हस्ताक्षर स्पर्धत नंबर येण्यासाठी त्यांना प्रयत्न करता आले असते; परंतु गणराजच्या घरची परिस्थिती त्यांना माहिती होती. त्यामुळे आपली मुले तर शिकणार आहेतच; पण गरिबाघरची मुले शिकली, तर आपले ज्ञानदानाचे काट सार्थकी लागतील. हा विशाल दृष्टीकोन ठेवून बनसोडे यांनी गणराजची तयारी करून घेतली. सरावासाठी लागणारे पेन, कागद वखर्चाने आणले. गणराज जेव्हा स्पर्धेत पहिला आला, तेव्हा त्याच्यासाठी कष्ट घेणाऱ्या त्याच्या वर्गशिक्षकांनी वडिलांपेक्षा शिक्षक म्हणून केलेले कर्तव्य मोठे असल्याचे सिद्ध केले आहे....

VO_ तीन दिवसांपूर्वी याच सुलेखन स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविणाऱ्या श्रेया सजनचा व्हीडीओ सोशल मीडियावर
व्हायरल झाला...तिच्या सुलेखनाचे जगातल्या नेटीझन्सने कौतूक केले. तिच्या सुलेखनाला मिळालेल्या
लाखो लाईक्सची भुरळ सर्वानाचा पडली...त्यांनीही श्रेयाची शोषण मीडियावर व्हिडीओ व्हायरल केला.हे करताना अनेकांनी सुलेखन स्पर्धेत श्रेयाच प्रथम आल्याचे दाखविले...श्रेयाच्या यशाबद्दल तिचे कौतूक करायलाच हवे; परंतु तिच्या कौतुकात याच स्पर्धेत पहिला आलेल्या; परंतु सोशल मीडियावर पोहोचू न शकलेल्या गणराजला शोधावे, असे कुणालाही वाटले नाही यामुळे गणराज दुर्लक्षित राहिला....
Body:mh_ahm_shirdi_best handwriting_8_ special pkg_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_best handwriting_8_ special pkg_mh10010
Last Updated : Feb 9, 2020, 2:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.