ETV Bharat / state

Ganesh Festival २०२३ : गणरायानं स्वप्नात येऊन सांगितलं मूर्तीचं गुपीत, वाचा खंडाळ्याच्या पावन गणपतीची आख्यायिका

Ganesh Festival २०२३ : खंडाळ्यातील शेती महामंडळाच्या एका व्यवस्थापकाच्या स्वप्नात गणराया आले होते. त्यांनी मी लिंबाच्या झाडाखाली पालथा पडलो असून माझी प्राणप्रतिष्ठा कर असं सांगितलं. त्यामुळे व्यवस्थापकाच्या सांगण्यावरुन शेती महामंडळाच्या कामगारांनी सांगितलेल्या ठिकाणी खोदकाम केलं असता, तिथं गणरायाची मूर्ती मिळून आली. तेव्हापासून पावन गणपतीचं मंदिर बांधण्यात आलं.

Ganesh Festival 2023
खंडाळ्याचा पावन गणपती बाप्पा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2023, 10:44 AM IST

Updated : Sep 27, 2023, 2:04 PM IST

खंडाळ्याच्या पावन गणपतीची आख्यायिका

शिर्डी : Ganesh Festival २०२३ : व्यवस्थापकाच्या स्वप्नात येऊन गणपतीनं जमीनीखाली मूर्ती असल्याचं गुपीत सांगून त्याची प्राणप्रतिष्ठा करण्याचं महाव्यवस्थापकाला सांगतलं. त्यानंतर खंडाळा इथं पावन गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अतिशय रंजक असलेली ही कथा आहे श्रीरामपूरमधील खंडाळा इथच्या पावन गणपतीची. गणेश उत्सव ( Ganesh Festival ) काळात इथं भाविक मोठ्या उत्साहानं दाखल होत गणरायाची पूजा अर्चा करतात.

महामंडळ व्यवस्थापकाच्या स्वप्नात आले गणराया : श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा कालव्या नजीक वसलेलं खंडाळा हे छोटस गाव आहे. सरकारनं सिलींग कायदा आणत शेती महामंडळाची इथं स्थापना केली. शेती महामंडळ स्थापन करत या भागात चिंचणकरवाडी स्थापन झाली. पूर्वी अदीलशाहीचा भाग असलेल्या या परिसरात शेती महामंडाळाचे मळे फुलू लागले होते. याच श्रीरामपूर तालुक्यातील शेती महामंडळाच्या जमीनीत शेकडो वर्षापूर्वी सापडलेली ही मूर्ती इथं स्थापन करण्यात आली. आजपर्यंत अनेकदा या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येऊन आता सुंदरसं मंदीर इथं उभारण्यात आलं आहे. या महमंडळाच्या एका व्यवस्थापकाच्या स्वप्नात गणराया आले होते. त्यांनी जमीनीतील मूर्ती स्थापीत करण्याचं त्यांना स्वप्नात सांगितलं.

कामगारांनी केलेल्या खोदकामात आढळली गणरायाची मूर्ती : व्यवस्थापकाच्या स्वप्नात गणरायांनी मूर्ती जमीनीखाली असल्याचं सांगितलं होतं. त्यावरुन या व्यवस्थापकानं कामगरांना मूर्ती शोधण्यास सांगितलं. कामगारांनी खोदकाम केलं असता, खरच मूर्ती आढळून आली. शेती महामंडळाच्या कामगारांनी या ठिकाणी मूर्तीची स्थापना केली. पूर्वी छपराचं नंतर पत्र्याचं आणि आता सुंदर मंदिर इथं उभारण्यात आलं आहे. निसर्गरम्य ठिकाणी असलेलं खंडाळ्याचा पावन गणपती मंदिराची महती हळूहळू पंचक्रोशीत पसरायला लागली. त्यामुळे या परिसरात भाविकांचा राबता सुरु झाला. आता संकष्टी, अंगारिका चतुर्थी आणि गणेश उत्सव काळात या मंदिरात भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात.

काय सांगितलं होतं गणरायांनी स्वप्नात : श्रीरामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. त्यात सरकारनं शेतकऱ्यांच्या जमीनी खंडानं घेत शेती महामंडळ स्थापन केलं. याच महामंडळाच्या टिळकनगर परिसरातील मॅनेजरच्या स्वप्नात येत गणरायानं मी लिंबाच्या झाडाखाली पालथ्या स्वरुपात पडलो, माझी स्थापना कर असा द्रुष्टांत दिला. त्यामुळे कामगारांनी ही मूर्ती शोधून काढली. चिचणकरवाडी परिसरात लिंबाच्या झाडाखाली गणेशाची मूर्ती सापडली. तिथचं त्या मूर्तीची स्थापन शेती महामंडळाच्या कामगारांनी करत पूजा अर्चा सुरु केली, अशी या खंडाळ्याच्या पावन गणपतीची अख्यायिका आहे. या मंदिराची संपूर्ण देखभाल शेती महामंडळाचे कामगार करत असल्यानं महामंडळातील कामगारचं या मंदिराचं व्यवस्थापन पाहतात.

हेही वाचा :

Ganesh Festival २०२३ : ठाण्यात भरला अनोखा मोदक महोत्सव; आकर्षक मोदकांनी घातली भाविकांना भुरळ

Ganeshotsav २०२३ : पुण्यात गणेशोत्सवाचा जल्लोष; पाहा, दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती

Last Updated : Sep 27, 2023, 2:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.