अहमदनगर- नेपाळमधील तबलिगी जमातीच्या १४ जणांना संमनेरमध्ये आसरा देण्यात आल्याची बाब समोर आली आहे.पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या १४ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच या १४ जणांना आसरा देणाऱ्या मोमीनपुरा भागातील ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१४ जणांसह मोमीनपुरा भागातील या 5 जणांची आणि त्यांच्या कुटुंबीयांसह शेजाऱ्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. हे लोक करोनाबाधित आहेत की नाही? याचाही तपास करण्यात येणार आहे. दरम्यान, नेपाळमधील तबलिगी जमातीच्या लोकांना संगमनेरमध्ये आसरा देण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. संगमनेर शहरातील पंधरा जणांना या आधीच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल आहे.
जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आल्याने बाहेरच्या लोकांना शहरात येण्यास मनाई करण्यात आली आहे. देशाच्या आणि राज्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना घराच्या बाहेर न पडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. गर्दी टाळण्याच्या आणि बाहेरून आलेल्या लोकांच्या संपर्कात न येण्याच्या सूचनाही करण्यात आलेल्या असताना संगमनेरमध्ये मात्र त्याचे उल्लंघन होताना दिसत आहे.