ETV Bharat / state

बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार.. साकूर-जांबुत रस्त्यावरील घटना

शेतकरी गुलाब टावरे साकूर-जांबुत रस्त्यापासून काही अंतरावरच असलेल्या टावरे वस्ती येथे राहात आहेत. घरासमोरच त्यांची मोठी पत्र्याची शेड असून संरक्षण म्हणून पाच फूट लांब तारेची जाळीही आहे. गुरुवारी पहाटे बिबट्या तारेवरून उडी मारून आत घुसला. त्याने चार शेळ्या जागीच ठार केल्या असून यामध्ये दोन लहान बकरेही आहेत. तर, एक शेळी गंभीर जखमी झाली आहे.

Ahmednagar Leopard Attack Latest News
अहमदनगर साकूर जांबुत बुद्रुक येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या ठार
author img

By

Published : Mar 19, 2021, 4:53 PM IST

अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील साकूर जांबुत बुद्रुक रस्त्यावरील टावरे वस्ती येथील गुलाब बळवंत टावरे या शेतकर्‍याच्या चार शेळ्या बिबट्याने ठार केल्या असून एक शेळी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना गुरुवार दिनांक 18 मार्चला पहाटे घडली.

तारेवरून उडी मारून बिबट्या घुसला आत

याबाबत माहिती अशी की, गुलाब टावरे हे शेतकरी साकूर-जांबुत रस्त्यापासून काही अंतरावरच असलेल्या टावरे वस्ती येथे राहात आहेत. घरासमोरच त्यांची मोठी पत्र्याची शेड असून संरक्षण म्हणून पाच फूट लांब तारेची जाळीही आहे. गुरुवारी पहाटे बिबट्या तारेवरून उडी मारून आत घुसला. त्याने चार शेळ्या जागीच ठार केल्या असून यामध्ये दोन लहान बकरेही आहेत. तर, एक शेळी गंभीर जखमी झाली आहे.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी

सकाळी टावरे शेडकडे गेले असता तर समोर त्यांना शेळ्या मृतावस्थेत दिसून आल्या. त्यामुळे त्यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली यापूर्वीही बिबट्याने याठिकाणी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी गुलाब टावरे, प्रकाश टावरे, संजय चोपडा, बाळासाहेब रासणे, अशोक दिघे, ज्ञानदेव दिघे, लक्ष्मण वाळुंज आदी शेतकर्‍यांनी केली आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.