अहमदनगर - खवले मांजराची तस्करी करणार्या चौघांच्या टोळीला संगमनेर तालुक्यातील साकुर पठारभागात पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक व त्यांच्या पथकाने अटक केली आहे. या टोळीकडून खवले मांजर वनअधिकार्यांनी ताब्यात घेतले. चौघांविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांना अटक करुन शिवाजी नगर न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची वनकोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
महेंद्र मच्छिंद्र केदार (वय ३५, रा. साकुर, ता. संगमनेर), सागर भिमाजी डोके (वय २५, रा. साकुर, ता. संगमनेर), अशोक दादा वारे (वय २९, रा. राहुरी, जि. अहमदनगर) व अनिल धोंडीबा भालेकर (वय ६१, रा. विठ्ठलवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.
सदर वनगुन्ह्यातील जप्त केलेले खवले मांजर हे भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२चे परिशिष्टातील अनुसूची क्र. १ नुसार दुर्मीळ व संरक्षित आहे. सदर खवले मांजर बाळगणे हा भारतीय वन्यजीव संरक्षम अधिनियम १९७२अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींना अटक करुन शिवाजीनगर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दि१८ फेब्रुवारी २०२१पर्यंत वनकोठडी देण्यात आली आहे.
सदर कारवाई पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील, सहाय्यक वनसंरक्षक मयूर बोठे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, दिपक पवार, सचिन रघतवान, वनपाल महेश मेरगेवाड, वनअधिकारी व कर्मचारी, तसेच जुन्नर व संगमनेर वनविभागाच्या पथकाने केली.
हेही वाचा - आयपीएल : किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने बदलले आपले नाव