अहमदनगर - माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी रविवारी शिर्डी येथील साई समाधीचे दर्शन घेतले. यानंतर देवेगौडा यांच्या हस्ते सायंकाळची धूपआरतीही करण्यात आली.
हेही वाचा - LIVE कर्नाटक पोटनिवडणूक निकाल : येडियुरप्पा सरकारचा धोका टळला, भाजपचा 12 जागांवर विजय
कर्नाटकात येडियुरप्पा सरकारच राहणार हे आजच्या (सोमवारी) पोटनिवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट झाले. आजचा दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाचा होता. त्याआधी रविवारी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी शिर्डीच्या साईबाबा मंदिरातील साई समाधीचे दर्शन घेतले. तसेच गौड़ा यांनी साईबाबांची सायंकाळी होणारी धूपआरतीही केली. यावेळी गौडा यांना साई संस्थानच्या वतीने शाल आणि साई मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले. साईदर्शनानंतर गौडा यांनी शनि शिंगणापूर येथे जाऊन शनिदेवाचेही दर्शन घेतले.