अहमदनगर - सध्या महाराष्ट्रात उन्हाचा पाराने उच्चांक गाठला आहे. अनेक तालुक्यात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातच जंगली प्राणी, पशु-पक्षी देखील पाण्यासाठी वनवन भटकंती करत आहेत. त्यातच एका वनविभागाच्या कर्मचाऱ्यांने जंगलातील एका गुहेत जाऊन बिबट्याच्या बछड्यांना पाणी पाजतानाचा व्हिडिओ आता समोर ( leopard cubs were watered ) आला आहे.
3 महिन्याच्या बछड्यांना पाजले पाणी - अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील टाकळी गावच्या जंगलात, वन कर्मचारी अशोक घुले त्यांचे सहकारी जंगलात खड्डे खोदण्याचे काम करत असताना बिबट्याच्या बछड्यांचा आवाज आल्याने गुहेच्या दिशेने गेले. त्याठिकाणी त्यांना बिबट्याचे 3 बछडे आढळून आले. कर्मचारी अशोक घुले यांची ही माहिती वन क्षेत्रपाल प्रदिप कदम यांना दिल्यानंतर कदम यांनी बछड्यांना पाणी उपलब्ध करुन देण्याच्या सुचना केल्या. कर्मचारी अशोक घुले यांनी 3 महिन्याच्या बछड्यांना एका टोकरीत पाणी उपलब्ध करुन देत चक्क एका बिबट्याच्या बछड्याला बाटलीने पाणी पाजत असतांना संपूर्ण व्हिडिओ शुट झाला आहे.
सर्व स्तरातून कौतुक - वनविभागाचे कर्मचारी अशोक घुले हे अनेक दिवसांपासून वनविभागात कर्मचारी म्हणून काम करत आहे. विहिरीत पडलेला बिबट्याबाहेर काढणे. मानव वस्तीत घुसलेला बिबट्या सुरक्षित बाहेर काढणे. बिबट्यांविषयी जनजागृती करणे यासह अकोले तालुक्यात बिबट्यांच्या रेस्कू टीममध्ये त्यांनी अनेकदा आपल्या कामाची छाप पाडली आहे. वन कर्मचारी अशोक घुले यांच्या या धडाकेबाज तसेच डेरिंगबाज कामाचे पुन्हा एकदा प्राणी मित्र तसेच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून कौतुक केले जात आहे.
हेही वाचा - मैत्रिणीच्या लग्नात मजा मस्ती करताना दिसली रश्मिका मंदान्ना