ETV Bharat / state

अहमदनगर : जमिनीचे निर्वनीकरण प्रकरण; 40 हजारांची लाच घेणाऱ्या वन अधिकाऱ्याला रंगेहाथ पडकले

संगमनेर तालुक्यातील डोळासणे येथील एका शेतकर्‍याला त्यांची शेतीचे डी.फॉरेस्ट म्हणजे निर्वनीकरण करणे आहे, असा अहवाल हवा होता. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा देखील केला होता.

forest officer arrested while taking bribe of 40 thousand rupees sangamer
लाच घेणाऱ्या वन अधिकाऱ्याला रंगेहाथ पडकले
author img

By

Published : Jul 4, 2021, 10:52 AM IST

संगमनेर (अहमदनगर) - 40 हजारांची लाच घेताना वनविभागाच्या एका अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. विशाल बोऱ्हाडे असे लाचखोर वनविभागाच्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

काय आहे प्रकार?

संगमनेर तालुक्यातील डोळासणे येथील एका शेतकर्‍याला त्यांची शेतीचे डी.फॉरेस्ट म्हणजे निर्वनीकरण करणे आहे, असा अहवाल हवा होता. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा देखील केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी कायदेशीरदृष्ट्या विशाल बोर्‍हाडे यास तक्रारदाराची जमीन निर्वनीकरण करणे आहे, असा अहवाल पाठविण्यास सांगितला होता. त्यानंतर तक्रारदार हा तेव्हा वनाधिकारी विशाल बोर्‍हाडे याच्याकडे गेला असता बोर्‍हाडे याने तक्रारदाराकडे 1 लाख रुपयांची मागणी केली. जर ही रक्कम मिळाली नाही तर काम होणार नाही, असे सांगितले. मात्र, तक्रारदाराने त्यास विनंती केली की, 'साहेब! माझ्याकडे इतके पैसे नाही, जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्याला माझी जमीन निर्वनीकरण आहे, असा रिपोर्ट पाठविण्यास सांगितले आहे'. मात्र, बोर्‍हाडे याने तक्रारदाराकडे सौदेबाजी सुरू केली.

यात तडजोडीअंती 40 हजार रुपये देण्याचे ठरले होते. हा सर्व घडलेला प्रकारबाबत त्यांनी नगर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपधीक्षक हरिष खेडकर यांना माहिती दिली. त्यानंतर खेडकर यांचे पथक थेट संगमनेरात दाखल झाले. डोळसाणे येथून जवळच असलेल्या आळेफाटा येथून 40 हजारांची लाच स्विकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा - 'पप्पा मला माफ करा' म्हणत 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या; पैठणमधील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.