कोपरगाव: एरव्ही बाजारात भाजी फळे खरेदी विक्री केली जाते येथे मोफत काही मिळत नाही. मात्र आज थेट कोपरगावच्या बाजारात मोफत कोरोना लसीकरण केले गेले. दुकानदारांनी फळ भाजी विक्रेत्यांची चौकशी करून लसीकरण झाल्याच्या प्रमाणपत्राची चौकशी केली.
यावेळी ज्या व्यावसायिक दुकानदारांनी कोरोना लसीकरण करून घेतले नाही अशा दुकानदार, व्यावसायिकांना जागेवरच कोरोना लस देण्यात आली. कोरोनाच्या नियंत्रणासाठी शहरासह तालुक्यात 100 टक्के लसीकरण व्हावे या हेतूने हे लसीकरण करण्यात आले. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. लस न घेता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.