ETV Bharat / state

बाळासाहेब थोरातांची काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड; संगमनेरमध्ये जल्लोष - balasaheb thorat news

बाळासाहेब थोरात काँग्रेसचे गटनेते झाल्यानंतर समर्थकांतर्फे संगमनेरसह तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाल व फुलांची उधळण केली.

celebration in sangamner
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड झाल्याची बातमी संगमनेरमध्ये पोहोचताच तालुक्यात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला
author img

By

Published : Nov 26, 2019, 11:16 PM IST

अहमदनगर - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड झाल्याची बातमी संगमनेरमध्ये पोहोचताच तालुक्यात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
थोरात काँग्रेसचे गटनेते झाल्यानंतर समर्थकांतर्फे संगमनेरसह तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाल व फुलांची उधळण केली.

बाळासाहेब थोरात काँग्रेसचे गटनेते झाल्यानंतर समर्थकांतर्फे संगमनेरसह तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली

बाळासाहेब थोरात 1985 पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून सलग 8 वेळी विजयी झाले आहेत. अडचणीच्या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळून त्यांनी पक्षाला नवी संजीवनी दिली. लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झालेल्या दारुण पराभव झाला. यानंतर अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. नंतर वरिष्ठ नेतृत्वाने थोरात यांच्यावर विश्वास टाकून त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली.

महाराष्ट्रात यापूर्वी महसूल, कृषी, शालेय शिक्षण, रोजगार हमी, जलसंधारण अशा महत्त्वाच्या पदांची त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ काँग्रेस प्रदेश अध्य्क्ष बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड झाल्याची बातमी संगमनेरात येताच तालुक्यात मोठा जल्लोष साजरा करण्यात आलाय....

VO_ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात 1985 पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने निवडणूक लढवत असून सलग 8 वेळेस ते विजयी झाले आहेत. सध्याच्या विधानसभेत सर्वाधिक वेळा विजय झालेले ते सर्वात वरिष्ठ सभासद आहेत. त्यामुळे आमदार बाळासाहेब थोरात यांना हा मान देण्यात आला आहे. अडचणीच्या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळून त्यांनी काँग्रेस पक्षाला नवी संजीवनी दिली आहे. यामुळे पक्ष नेतृत्वाचा त्यांच्यावर ठाम विश्वास असून एकनिष्ठता हे बाळासाहेब थोरात यांच्या स्वभाववैशिष्ट्य राहिला आहे. संयम , पारदर्शकता आणि एक निष्ठेचे फळ म्हणून संगमनेर करांना बाळासाहेब थोरात यांच्या रूपानं सर्वोच्च पदावर काम करण्याचा मान मिळाला आहे....

VO_ आमदार थोरात यांनी विधान भवनाचे अभ्यास मंडळाचे अध्यक्ष , हिमाचल प्रदेशचे निरीक्षक त्याचप्रमाणे गुजरात निवडणुकीमध्ये निवडणूक समितीचे अध्यक्ष अशी विविध पदे भूषवली असताना त्यांना राष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च कार्यकारणी मध्ये कायमस्वरूपी सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झालेल्या दारूण पराभवानंतर अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला यावेळी वरिष्ठ नेतृत्वाने आमदार थोरात यांच्यावर विश्वास टाकून त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली महाराष्ट्रात यापूर्वी महसूल, कृषी ,शालेय शिक्षण ,रोजगार हमी ,जलसंधारण अशा महत्त्वाच्या पदांची त्यांनी जबाबदारी निभावली होती. त्या काळातही एक लोकाभिमुख चेहरा म्हणून त्यांनी महाराष्ट्रात नाव मिळवले होते कायम सर्वसामान्यांचा नेता म्हणून अशी ओळख असलेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांची गटनेतेपदी निवड अपेक्षित होती आणि त्यानुसार सध्याच्या राजकीय परिस्थिती मध्ये पुन्हा एकदा पक्षनेतृत्वाने बाळासाहेब थोरात यांना संधी दिली आहे....

VO_संगमनेरात सर्वत्र जल्लोष : फटाक्यांची आतषबाजी बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे गटनेते झाल्याचे वृत्त समजताच संगमनेर शहरासह तालुक्यात फटाक्यांचे अतिशबाजी झाली आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्या निवडीने संगमनेर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यासाठी ही गौरवाची बाब ठरली आहे. त्यांच्या निवडीचे वृत्त समजतात सर्वत्र गुलाल आणि फटाक्यांची उधळण झाली....Body:mh_ahm_shirdi_congress jalosh_26_visuals_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_congress jalosh_26_visuals_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.