अहमदनगर - देशात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील कलाकारही घरीच असून काहींच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असतानाही हे कलाकर आपल्या कलेच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. देवळाली प्रवरा येथील युवा कलाकार रवी सरोदे, योगेश सरोदे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जनजागृती सुरू केली आहे.
हेही वाचा - कोरोनावर मात : पिंपरी-चिंचवडमधील पाच जणांना आज मिळणार 'डिस्चार्ज'
कोरोनासंबंधित लोकगीते सादर करून जनजागृती करण्याचे काम हे कुटुंब करत आहे. कोपरगाव येथील नकलाकार संदीप जाधव यांनीही दादा कोंडकेच्या रुपात आणि ढंगात कोरोनासंदर्भात जनजागृती केली आहे. श्रीरामपुरातील चित्रकार भागवत हेही आपल्या चित्रांच्या माध्यमातून गागृती करत आहेत.