ETV Bharat / state

First Cooperative Sugar Factory: 'असा' उभा राहिला आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना, पहिले सहकार मंत्री अमित शाह देणार भेट - MP Sujay Vikhe Patil

संपूर्ण आशिया खंडात सहकारी तत्वावर चालणाऱ्या पहिल्या साखर कारखान्याचे ( First Cooperative Sugar Factory In Asia ) उद्घाटन १९६२ साली अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगर येथे झाले. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ( Pandit Jawaharlal Nehru ) यांनी या कारखान्याचे उद्घाटन केले होते. चला तर जाणून घेऊयात कशाप्रकारे उभा राहिला हा आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना..

आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना
आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना
author img

By

Published : Dec 17, 2021, 4:40 PM IST

शिर्डी (अहमदनगर)- आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरचा पहिला साखर कारखाना ( First Cooperative Sugar Factory In Asia ) अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथील प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे ( Pravara Cooperative Sugar Factory ) काम 31 डिसेंबर 1950 रोजी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील ( Dr Vithalrao Vikhe Patil ) यांच्या नेतृत्वाखाली सुरु झाले. काही महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालय ( Cooperative Ministry ) स्थापन केले आहे. केंद्रीय सहकार खात्याचे पहिले मंत्री अमित शाह ( Minister Amit Shah ) यांना करण्यात आले आहे. सहकाराचे पहिलेच केंद्रीय मंत्री शहा झाल्यानंतर आशिया खंडातील पहिला साखर कारखाना असलेल्या प्रवरा कारखान्यावर राज्‍यस्‍तरीय सहकार परिषद ( State Level Cooperative Council ) ते घेणार असल्याने सर्वांचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे.

'असा' उभा राहिला आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना, खुद्द अमित शाह येणार भेटीला

विठ्ठलराव विखे पाटलांकडे होती दूरदृष्टी

राहाता तालुक्यातील प्रवरानगर (Pravaranagar In Rahata ) येथे आशिया खंडातील पहिल्या सहकारी प्रवरा कारखान्याची 31 डिसेंबर 1950 या दिवशी मुहूर्तमेढ रोवली गेली. आशिया खंडातील पहिला सहकारी कारखाना आपल्या अथक परिश्रमाने आणि दूरदृष्टीने लोणी या ठिकाणी सुरू करणारे देशातील पहिले सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांचे कार्य सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय होते. महाराष्ट्राला सहकार क्षेत्रात आज जो नावलौकिक प्राप्त झालेला आहे. त्याचे खरे श्रेय विखे पाटलांना द्यावे लागेल. सहकाराच्या माध्यमातूनच समाजाचा खऱ्या अर्थाने विकास करता येईल. कृषी प्रधान असलेल्या भारतासारख्या देशाला सहकाराच्या माध्यमातूनच पुढे घेऊन जाता येईल, ही दूरदृष्टी त्यांच्याकडे होती.

पंतप्रधान नेहरूंच्या हस्ते झाले उदघाटन

शेतकऱ्यांना सुखासमाधानाने आपले जीवन जगता यावे. त्यांच्या मालाला बाजारमूल्य प्राप्त करुन देता यावे. शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा थांब्याव्यात. त्यांना स्वाभिमानाने स्वयंपूर्ण जीवन जगता यावे, या उद्धेशाने 15 मे 1962 या रोजी कारखाना सुरु झाला. लोणी, प्रवरानगर या ठिकाणी कारखाना त्यावेळचे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक उद्घाटन करून सुरु केला.

सहकारातून आली समृद्धी

अहमदनगर जिल्ह्यातील आजूबाजूच्या खेड्यातील व गावातील लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचे काम या सहकारी तत्वावरील साखर कारखान्यामुळे शक्य झालं. याचं संपूर्ण श्रेय हे सहकारमहर्षी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनाच द्यावे लागेल. लोकांच्या हाताला काम तसेच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर देऊन त्यांची आर्थिक विवंचना थांबवण्याचे काम हे या सहकारामुळे शक्य झालं. आज संपूर्ण महाराष्ट्मध्ये अनेक सहकारी तत्त्वावरील उद्योग व्यवसाय उभे राहिलेले आहेत. महाराष्ट्राच्या एकूणच विकास प्रक्रियेमध्ये सहकार क्षेत्राचे योगदान हे महत्त्वपूर्ण राहिले आहे. पुढच्या काळामध्ये अनेक दूरदृष्टीचे नेते आणि सहकारमहर्षी या क्षेत्राला लाभले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुढील काळात अनेक सहकारी संस्था सहकारी तत्त्वावर उभ्या राहिल्या. दूध संघ, सहकारी बँका, को- ऑपरेटिव्ह सोसायटी, शेती संस्था, या प्रकारच्या संस्था निर्माण झाल्या. सहकारी कारखाने उभे राहिले. यातून ग्रामीण जीवन आणि शेतकरी यांच्या विकासाला चालना मिळाली.

प्रवरा शिक्षण संस्थेची स्थापना

सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेनंतर विखे कुटुंबाने शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. विठ्ठलराव विखे यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना ( Pravara Gramin Shikshan Sanstha ) केली. त्यानंतर त्यांचे पुत्र बाळासाहेब विखे पाटील ( Balasaheb Vikhe Patil ) 1962 पासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले होते. विठ्ठलराव विखे यांचे 27 एप्रिल 1980 साली निधन झाले. यानंतर बाळासाहेब विखे-पाटील प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष झाले. बाळासाहेब विखे-पाटील यांचे वयाच्या 84 व्या वर्षी 30 डिसेंबर 2016 रोजी लोणी येथे निधन झाले. बाळासाहेब यांचे पुत्र भाजप आमदार आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) आणि यांचे पुत्र नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे ( MP Sujay Vikhe Patil ) प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे काम पाहत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.