अहमदनगर - अंगणात खेळणार्या मुलांच्या वादातून बुधवारी सायंकाळी पावणेपाच वाजताच्या सुमारास श्रीरामपूरमधील हुसेननगर भागात गोळीबार करण्यात आला. यात तिघे जण जखमी झाले असून गोळीबार करणारे दोन्ही आरोपी जखमी झाले आहेत.
हेही वाचा - 'केंद्रीय अर्थसंकल्प २०२०' ची तयारी : कराबाबत वित्त मंत्रालयाने मागविल्या सूचना
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी सायंकाळी पावणेपाच वाजताच्या वाजताच्या सुमारास श्रीरामपूरमधील हुसेननगर भागात गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार अंगणात खेळणाऱ्या मुलांच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, या घटनेत तिन जण जखमी झाले असून गोळीबार करणारे दोन्ही आरोपी देखील जखमी झाले आहेत. जखमींवर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेने श्रीरामपुर शहरात भीतीचे वातारण निर्मण झाले आहे.
हेही वाचा - अमेरिकेच्या बंदीनंतरही हुवाईची चांगली कामगिरी; कर्मचाऱ्यांना देणार २०४४ कोटींचा बोनस