ETV Bharat / state

अहमदनगर : किराणा मालाच्या दुकानाला भीषण आग, 2 कोटी रुपयांचे नुकसान

शिर्डी जवळील निमगाव येथील श्री जंगदब ट्रेडर्स सुपर शाॅपीला 5 जून 2022 रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास शाॅट सर्कीटमुळे भिषण आग लागली. या आगीत सुमारे 2 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.

Fierce fire at grocery store in Nimgaon
किराणा माल दुकान आग निमगाव
author img

By

Published : Jun 6, 2022, 11:03 AM IST

अहमदनगर - शिर्डी जवळील निमगाव येथील श्री जंगदब ट्रेडर्स सुपर शाॅपीला 5 जून 2022 रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास शाॅट सर्कीटमुळे भीषण आग लागली. या आगीत सुमारे 2 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.

दुकानाला आग लागल्याचे दृश्य

हेही वाचा - अबब..! 1, 2 नव्हे तर तब्बल 100 जणांचा वाढदिवस एकाच दिवशी साजरा, पाहा व्हिडिओ..

5 जून रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास या सुपर शाॅपीला मोठी आग लागल्याची माहिती सुरक्षा रक्षक रोहन जगताप यांनी फोनवरून दिल्याने आम्ही घटनास्थळी हजर झालो. भीषण आगीत लाखो रुपयांचे फर्निचर, किराणा सामान, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती भांडी, रॅक शेड, फ्रिज प्लास्टिक गृहउपयोगी या वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडल्या. आग मोठी भीषण असल्याने साईबाबा संस्थान शिर्डी, नगरपरीषद शिर्डी व राहता परिषद यांच्या अग्निशामक बंबांनी रात्री उशिरा पर्यंत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. घटनेची माहिती होताच रात्री शिर्डी पोलीस व वाहतूक शाखेच्या अधिकारी व पोलिसांनी जमावाला आटोक्यात आणण्यासाठी मोठा आटोकाट प्रयत्न केला.

आग विझवण्यासाठी निमगाव कोर्‍हाळे व निघोज गावातील ग्रामस्थांनी मोठा प्रयत्न केला. मात्र, आगीची दाहकता मोठी असल्याने रात्री उशिरा आग विझवण्यात यश मिळाले. असे असले तरी जवळपास अंदाजे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेची माहिती दत्तात्रय वाळुंज यांनी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये दिल्याने शिर्डी पोलिसांनी अकस्मात आग २/२०२२ अन्वये नोंद केली असून, या घटनेचा तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश सोनवणे हे करीत आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांचे आंदोलन मागे, मंगळवारी मुंबईत बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.