ETV Bharat / state

Modern Farming Machine : शेतकरी पिता-पुत्राचा अनोखा जुगाड; पिता-पुत्राने बनवले कोळपणी यंत्र - modern farming machine

संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील शेतकरी रामनाथ सोनवणे आणि समाधान सोनवणे यांनी आधुनिक कोळपणी यंत्राची निर्मिती (Creation of modern farming machinery) केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची वेळेसह पैशाची बचत होणार आहे. सोनवणे यांनी अवघ्या ३० ते ४० हजार रुपयात कोळपणी यंत्र (Modern farming machinery) बनवले आहे.

Modern Farming Machine
Modern Farming Machine
author img

By

Published : Aug 12, 2023, 7:50 PM IST

Updated : Aug 12, 2023, 8:48 PM IST

रामनाथ सोनवणे आणि साधन सोनवणे यांची प्रतिक्रिया

शिर्डी : ग्रामीण भागात देखील संशोधक वृत्ती दडलेली असते. फक्त दडलेल्या कल्पनाशक्तीला वाव मिळाला की ती आपोआप बाहेर येते. याचीच प्रचिती संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील शेतकरी पितापुत्राच्या कामातून दिसते आपल्या कल्पनाशक्तीच्या बळावर शेतकरी पिता पुत्राने शेतकऱ्यांसाठी कोळपणी यंत्र (Creation of modern farming machinery) तयार केले आहे. त्यामुळे त्यांचे संगमनेर परिसरात कौतुक होत आहे. रामनाथ सोनवणे तसेच समाधान सोनवणे असे या शेतकरी पिता पुत्राचे नाव आहे. सोनवणे यांचा वडिलोपार्जित वेल्डिंगचा व्यवसाय आहे. त्यांनी व्यावसाय सांभाळत शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त, असे अवघ्या ३० ते ४० हजार रुपयात कोळपणी यंत्र बनवले (Modern farming machinery) आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची वेळेसह पैशाची बचत होणार आहे.

बनवले अत्याधुनिक कोळपणी यंत्र : हे अत्याधुनिक कोळपणी यंत्र बनवण्यासाठी त्यांना साधारणपणे २ महिन्याचा कालावधी लागला. या यंत्राला पुढच्या बाजूने ५ एचपीचे इंजन बसवले असून ते स्वयंचलित आहे. तसेच यंत्राला चालवण्यासाठी ऍक्सीलेटर सिस्टम कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात हे यंत्र शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. संमगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील अतिशय सर्वसामान्य गरीब कुटुंबातील शेतकरी रामनाथ सोनवणे तसेच समाधान सोनवणे या पिता-पुत्राने आपला छोटासा वेल्डिंगचा व्यवसाय सांभाळत या यंत्राची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांचा वेळ तसेच त्यांची मेहनत कमी व्हावी या उद्देशाने त्यांनी शेतकऱ्यांसाठी कोळपणीयंत्राची निर्मिती केली आहे.

आधुनिक ट्रॅक्टर बनवण्याचा मानस : या यंत्राद्वारे सोयाबीन, मका, कापूस आदी पीकातील मशागतीची कामे केली जाणार आहेत. तसेच शेतात वाफे, सरी पाडण्यासाठी देखील या यंत्राचा वापर शेतकऱ्यांना करता येणार आहे. तसेच पिकांचे फवारणी यंत्र देखील या यंत्रावर बसवता येणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले आहे. या पिता-पुत्राने बनवलेल्या या बहुउद्देशीय यंत्राची सर्वत्र चर्चा होत असून हे यंत्र पाहण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने सोनवणे यांच्याकडे येत आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना शेतात नांगरणी, पेरणी करता येईल असा आधुनिक ट्रॅक्टर बनवण्याचा मानस पिता-पुत्रांनी व्यक्त केला आहे.

Last Updated : Aug 12, 2023, 8:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.