ETV Bharat / state

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे संगमनेर तालुक्यातील शेतकरी हैराण - वाढीव विजबिले अहमदनगर

वाढीव विजबिले आणि वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे मनस्तापाला सामोरे जाव लागत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कडबाकुट्टी मशीनसाठी चक्क 81 हजार रुपये बिल आले आहे.

farmers electricity bill problem
अहमदनगर
author img

By

Published : Feb 24, 2021, 6:57 PM IST

अहमदनगर - राज्यात सध्या ग्राहकांना वाढीव विजबिले आणि वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे मनस्तापाला सामोरे जाव लागत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कडबाकुट्टी मशीनसाठी चक्क 81 हजार रुपये बिल आले आहे.

अहमदनगर

महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी आणि घरगुती ग्राहक सध्या त्रस्त झाले आहेत. वीजग्राहकांना चुकीचे रीडिंग, वाढीव स्वरुपात विजेची बिले यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. या भोंगळ कारभारामुळे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील शेतकऱ्याची व्यथा पाहुयात. रामनाथ इंगळे ह्या शेतकऱ्याने कडबाकुट्टी मशीनसाठी एक एचपी विजेची जोडणी शासन योजनेअंतर्गत घेतली. सुरुवातीला नियमित बील दिले गेले. मात्र, त्यानंतर विजेचा भार हा 1 एचपीवरून थेट 7 एचपीपर्यंत परस्पर विद्युत मंडळाने वाढवत टाळेबंदीच्या काळानंतर तब्बल 81 हजाराचे बिल दिले. इतके भले मोठे बील येऊनही महावितरणकडून उडवा-उडवीची उत्तरेच मिळत असल्याचे रामनाथ इंगळे यांनी सांगितले.

संपूर्ण डिपीचीच जोडणी बंद करण्याचे काम

विज वितरण कंपनीने सध्या शेतीचे विजबील थकीत असल्याचे सांगत विज खंडीत करण्यास सुरुवात केली आहे. एव्हढ्यावरच न थांबता संपूर्ण डिपीचीच जोडणी बंद करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी आणखीनच वैतागले आहेत. मात्र, 2003 च्या विज कायद्यानुसार शेतकऱ्यांना थकबाकी असेल तर शेतकऱ्यांना पंधरा दिवस आधी नोटीस देणे बंधनकारक असते. मात्र, तसे न करता विज जोडणी तोडली जात असल्याचे शेतकरी सांगतात. दरम्यान, नवीन वीज कायद्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतात विज खांब आणि रोहीत्र असेल तर त्यापोटी शेतकऱ्यांना भाडे देणे बंधनकारक आहे. मात्र, ग्रामीण भागात रोहीत्र जळाले की उलट शेतकऱ्यांकडुनच पैसे घेतले गेले. त्यामुळे गेल्या काही वर्षांचा हिशोब केला तर विज वितरण कंपनीच शेतकऱ्यांना देणे लागते, असे यावेळी प्रगतशील शेतकरी सतिश कानवडे म्हणाले. शेतकरी सध्या विज वितरण कंपनीच्या कारभाराला कंटाळले असून या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन आणि न्यायालयात जाण्याच्या पावित्र्यात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.