ETV Bharat / state

पाखरांना खाण्यासाठी ज्वारीचं रान केलं खुलं, नगरच्या बळीराजाचं पक्षीप्रेम

सर्वत्र दुष्काळ पडल्यामुळे पक्षांना पाण्याचे आणि खाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. पक्षी थोड्याशा अन्नासाठी रानोमाळ भटकत आहेत. त्यामुळे रामदास अस्वले यांनी त्यांच्या शेतातील ज्वारीचे पीक कापण्याऐवजी ते तसेच ठेवण्याचा निर्णय घेतला.

author img

By

Published : Mar 28, 2019, 12:50 PM IST

अकोल्यातील शेतकरी रामदास अस्वले

अहमदनगर - पशू, पक्ष्यांवर प्रेम करावे असे आपण नेहमीच बोलत असतो. पण, प्रत्यक्ष कृती करताना फारच थोडे लोक दिसतात. अशाच मोजक्या लोकांपैकी एक आहेत, अकोले तालुक्यातील वीरगावचे शेतकरी रामदास अस्वले. त्यांनी आपल्या शेतातील १५ गुंठे जमिनीवर लावलेली ज्वारी पाखरांसाठी राखून ठेवली आहे. तसेच, त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. पक्ष्यांची जगण्यासाठीची धडपड पाहून मला हे करावे वाटले, असे ते म्हणतात.

सर्वत्र दुष्काळ पडल्यामुळे पक्षांना पाण्याचे आणि खाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. पक्षी थोड्याशा अन्नासाठी रानोमाळ भटकत आहेत. त्यामुळे रामदास अस्वले यांनी त्यांच्या शेतातील ज्वारीचे पीक कापण्याऐवजी ते तसेच ठेवण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्या शेतात शिवारातील असंख्य जातीची पाखरं दाणे खाण्यासाठी येतात. तसेच, मधमाशांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था केल्यामुळे मधमाशा देखील त्यांच्या शेतात मुक्कामाला असतात.

माणसं भुकेली राहू नयेत म्हणून शासनाने रेशनची व्यवस्था केली. पण, पाखरांना अशी कोणतीही व्यवस्था नाही. प्रत्येक शेतकऱयाने पक्षांना खाण्यासाठी थोडी सुविधा केल्यास पक्षांसाठी अन्नाची सोय होईल, असे अस्वले म्हणाले. पशू पक्षांना पाणी पिण्यासाठी आपल्या शेतात छोटेसे शेततळे बांधण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

अस्वलेंच्या शेतात निरनिराळ्या जातीची पाखरे येतात. यात कावळा, चिमणी, दयाळ, साळुंखी, पारवा, कबूतर, हुदहूद, तांबट, लावी, शिंपी, सुर्यपक्षी, राखी, वटवट्या, सातभाई, बुलबुल, शिंजीर, वेडा राघू, सुरंगी, तित्तर, घुबड, कोकीळ, सुगरण, मुनिया, होला, कापशी, गाय बगळा, कोतवाल, चष्मेवाला, वंचक, शराटी अशा विविध प्रजातींच्या पक्षांचा समावेश आहे.

Intro:

Shirdi_ Ravindra Mahale

रणरणत्या उन्हात निसर्गातील पक्षांची जगण्यासाठीची धडपड सुरु असताना अकोले तालुक्यातील वीरगावच्या रामदास अस्वलेंनी आपल्या शेतातच पक्षांना जगण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली.संपुर्ण ज्वारीचे शेतच त्यांनी पक्षांसाठी उपलब्ध करुन दिले.या शेतात सर्वच पक्षांची मनसोक्त हुरडा पार्टी चालते....

रामदास अस्वले हे पक्षीमित्र असून विविध प्रकारच्या जातीचे पक्षी त्यांच्या शेतात बघायला मिळतात.भयंकर दुष्काळात पक्षांची खाण्याची आणि पिण्याचे पाण्याची दुर्दशा झालेली असताना त्यांनी जनावरांच्या चा-यासाठी ठेवलेल्या ज्वारीच्या कोवळ्या कणसांवर आता पाखरे मुक्त विहारतात..पंधरा गुंठे ज्वारीची त्यांनी जनावरांसाठी पेरणी केली.ज्वारी बहरात आली असताना पक्षांची जगण्याची धडपड बघता त्यांनी ज्वारीची कापणीच रहित केली....

वीरगाव शिवारात आता पक्षांसाठी काहीही खाद्य उरले नसल्याने पक्षांची गर्दी त्यांचे शेतात कायम असते..पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याचीही त्यांनी व्यवस्था केली.शेताच्या बांधावर,झाडांच्या सावलीत त्यांनी मडकी भरुन ठेवलेली आहे.पक्षांची व्यवस्था केलीच शिवाय कायम स्वच्छ पाणी प्राशन करणा-या मधमाशांसाठीही प्रयोगशीलरितीने त्यांनी पिण्याचे पाणी उपलब्ध ठेवले....
कावळा,चिमणी,दयाळ,साळुंखी,पारवा,कबूतर,हुदहूद,तांबट,लावी,शिंपी,सुर्यपक्षी,राखी.वटवट्या,सातभाई,बुलबूल,शिंजीर,वेडा.राघू,फ्लाय.कँचर,सुरंगी,तित्तर,घुबड,कोकीळ,सुगरण,मुनिया,होला,कापशी,गाय बगळा,कोतवाल,चष्मेवाला,वंचक,शराटी अशा विविध प्रकारच्या जातीच्या पक्षांचा कलरव त्यांचे शेतात दिवसभर ऐकू येतात.शेतीउत्पन्नाच्या शाश्वतीसाठी पक्षांचा अधिवास महत्वाचा आहे.सर्वच पक्षी धान्य खात नाहीत..अनेक पक्षी शेतातील किडे,अळ्या खाऊनही जगतात असे रामदास अस्वले यांनी सांगितले.त्यांचे सर्व कुटूंबच पक्षीप्रेमी असून त्यांचेही कायम सहकार्य असल्याची माहिती त्यांनी दिली....

माणसं भुकेली राहू नये म्हणून शासनाने रेशनची व्यवस्था केली.चराचर जीवंत ठेवणा-या पक्षांना मात्र आस्तित्वासाठी झगडावे लागते.प्रत्येक शेतक-याने पक्षांच्या उपजिवीकेसाठी अगदी अत्यल्प प्रमाणात का होईना खाण्यासाठी नैसर्गिक सुविधा तयार केल्यास पक्षांची मोठ्या प्रमाणावर वाढ होईल.पक्षी आणि इतरही वन्य पशूंच्या पिण्याच्या पाण्यासाठी छोटेसे शेततळे तयार करण्याचा विचार रामदास अस्वले यांनी वक्त केला आहे....Body:27 March Shirdi Akole Love BirdsConclusion:27 March Shirdi Akole Love Birds
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.