अहमदनगर - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कसलीही तरतूद नाही. सरकारचे धोरण पाहता शेती आणि शेतकरी अधोगतीला लागणार असल्याची टीका शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली आहे.
'गाव-गरीब आणि किसान' अशी घोषणा जरी अर्थमंत्र्यांनी केली असली तरी त्यात तथ्य नसल्याचे घनवट यांनी निदर्शनास आणले. आधुनिक तंत्रज्ञानासाठी तरतूद नाही. शेतीला स्वायत्तता नाही असे ते म्हणाले. खर्च शून्य (झिरो बजेट) शेतीला प्रोत्साहना मागे उत्पादन घटवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोपही घनवट यांनी केला.