ETV Bharat / state

'लहानपणी गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकलो, तिथेच आता शहरातून येऊन क्वारंटाईन झालो' - क्वारंटाईन टाईम न्यूज

क्वारंटाईन म्हणून शाळा, मंगलकार्यालये अथवा प्रशासनाने सुचवलेल्या ठिकाणी 14 दिवस राहणे अर्थात क्वारंटाईन होणे म्हणजे मोठी चिंता आणि शिक्षा अनेकांना वाटत असते. मात्र, अनेक गावात शाळेत क्वारंटाईन असलेले नागरिक मात्र याला अपवाद म्हणून पुढे येत इतरांना आम्ही चुकलो मात्र तुम्ही चुकू नका, घरी राहा सुरक्षित राहा, हाच संदेश देत आहेत.

rahata news
'लहानपणी गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकलो, त्याच शाळेत आता शहरातून परत आल्याने क्वारंटाईन झालोत'
author img

By

Published : May 20, 2020, 12:16 PM IST

शिर्डी(अहमदनगर) - लॉकडाऊनमुळे शहरातून आपल्या गावी जाण्याची काही लोकांना परवानगी मिळाली. तर, काही लोकांनी परवानगी न घेताच गावाकडे परतले आहेत. अशात रेड झोनमधून आलेल्यांना लहानपणी गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकवले तिथेच क्वारंटाईन व्हायची वेळ आली आहे. अशावेळी पुस्तके वाचत शाळेची साफसफाई आणि शाळेतील झाडांना पाणी घालत हे लोक आपला वेळ घालवत आहेत.

शहरातून गावातल्या आपल्या घरी जाऊन मस्त राहू, असा विचार करून गावाकडे परतलेल्या अनेकांना आता घरजवळ असूनही नियमामुळे कधीकाळी ज्या शाळेत जायला रडायचो तिथेच आता क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या धास्तीने अनेकजण हादरून गेले आहेत. परगावाहून गावी आल्यानंतर गावातील शाळेत क्वारंटाईन व्हायचे म्हटले तर अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोयी-सुविधांचा अभाव आहे. मग झोपायचे कसे, राहायचे कसे, दिवसरात्र कटणार नाही, बोर होईल असे एकनाही अनेक प्रश्न अनेकांसमोर उभे राहतात. सुविधांच्या अभावामुळे अनेकजण क्वारंटाईन केलेल्या शाळांमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

'लहानपणी गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकलो, त्याच शाळेत आता शहरातून परत आल्याने क्वारंटाईन झालोत'

राहाता तालुक्यातील खडकेवाके गावात बाहेर गावाहून आलेले एक जोडपे आपल्या एक दोन चिमुकल्या मुली़ना घेवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत असलेल्या झांडांना पाणी घालून आपली शाळा समजून तेथील झाडलोट करत आहेत. तसेच पुस्ककांचे वाचन करत आपला दिवस व्यस्त करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.