शिर्डी- सबका मालिक एकचा महामंत्र तसेच गोरगरीब आणि पिडितांची सेवा हीच ईश्वर सेवा हा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांचा हाच संदेश घेऊन विजयवाडा येथील शिर्डी साईबाबांचे परमभक्त श्रीनिवास यांनी शिर्डीत द्वारकामाई वृद्धाश्रम सुरू केला आहे.
विजयवाडा येथील श्रीनिवास यांनी 14 वर्षा पूर्वी शिर्डीत साईबाबांच्या मंदिरापासुन अवघ्या 5 किलो मीटर अंतरावर असलेल्या कनकुरी गावाजवळ द्वारकामाई वृद्धाश्रम सुरू केले आहे. मुल असुन अनाथ असलेल्या माता पित्यांना वार-यावर सोडणारे कमी नाहीत. या वृद्धाश्रमात शेकडो वृद्ध, अपंग राहातात. पोटाला चिमटे घेऊन लहानाच मोठ करणार-या आई वडीलांना उतरत्या वयात कशा यातना देतात हे या वृद्धाश्रमात आल्यावर समजते. आज या वृद्धाश्रमात, देशातील अनेंक राज्यातील तब्बल 130 वृद्ध , अपंग अनाथ राहत आहेत.
विजयवाडा येथील आहेत श्रीनिवास
या आश्रमाचे संस्थापक श्रीनिवास हे मुळ विजयवाडा येथील रहिवासी मात्र शिर्डी साईबाबांचे परमभक्त असल्याने त्यांनी साईबाबांची सेवा म्हणून हैद्राबाद येथील एका साई मंदिरात साई सेवा करत होते. त्यावेळी अनेक वृद्ध भक्त मंदिरात येत होते. त्यातील काही भक्त घरात सर्व काही असताना मुल सांभाळ करत नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत असल्याचे श्रीनिवास यांच्या लक्षात आले. काही भाविक ही त्यांना म्हणाले, की साईबाबांचा दर्शना बरोबर कुठे एक अनाथ आश्रम असेल तर बरं होईल, म्हणून श्रीनिवास यांनी हैद्राबाद येथील काही लोकांचे एक ट्रस्ट स्थापन केले. एक वृद्धाश्रम स्थापन करण्याचे ठरवले आणि या ट्रस्टचे अध्यक्ष पद श्रीनिवास यांनी घेत साईबाबांच्या शिर्डीत एक द्वारकामाई वृद्धाश्रम सुरू केले आहे. आज 14 वर्षापासुन मोफत या अनाथांचा संभाळ करतायत. या वृद्ध , अपंगांचे दुःख आपण ऐकले तर अक्षरशा आपल्या डोळ्यांतून पाणी आल्या शिवाय राहणार नाही.
अशी असते दिनचर्या
आश्रमातील साई धान्य मंदिरात साईबाबांचे काही तास धान्य केले जाते, त्या नंतर सकाळी 8 वाजता सर्वाना नाष्टा आणि चहा त्याना दिला जातो, त्या नंतर दुपारी 12 वाजता जेवण , या नंतर आश्रमात सर्व भाषिक अनाथ असल्याने सर्वाना सिनेमा हॉल मध्ये हिंदी आणि मराठी तेलगू चित्रपट दाखवले जातात. त्यांना सर्वाना विश्रांतीसाठी आपल्या हॉल मध्ये नेऊन सोडल्या जाते. पुन्हा दुपारी 4 वाजता सर्वाना चहा आणि नाष्टा दिला जातो. सांयकाळी 6 वाजता धान्य मंदिरात साईबाबांची आरती होते, आणि पुन्हा सर्वाना रात्री 8 वाजे पर्यंत चित्रपट हॉल मध्ये चित्रपट दाखवला जातो. त्या नंतर सर्वांना जेवण दिले जाते, सर्वांचे जेवण झाल्या नंतर या सर्वांचे डॉक्टर कडून चेकप केले जाते. अशा पध्दतीने या सर्व वृद्ध , अपंग अनाथांची सेवा श्रीनिवास करत आहे. श्रीनिवास करत असलेले कार्या बदल कधीही प्रसारमाध्यमसमोर मांडत नाही. कारण ही सगळी सेवा साईबाबा माझाकडुन करून घेत आहे, यात माझे काही नाही बाबा जे सांगतात तेच मी करत असल्याचं यावेळी श्रीनिवास यांनी सांगितले आहे.
अनाथांनी व्यक्त केल्या भावना
मुल असुन अनाथ असलेल्या माता पित्यांना वार-यावर सोडणाऱ्या, माता पित्याना आता श्रीनिवास आणि त्यांच्या पत्नी यांच्या रूपात मुलगा आणि सुनबाई भेटली आहे. ज्यांना लहानचे मोठे केले त्यांची वाऱ्यावर सोडले, आणि ज्यांचाशी काही संमध नसलेल्या श्रीनिवास आम्हाला मुलांना पेक्षा चांगलं सांभाळत असल्याची भावना यावेळी अनाथांनी व्यक्त केली आहे. असे वाटत ही नाही की आम्ही अनाथ आहे, आणि कधी कोणाची आठवण पण येत नाही कारण, श्रीनिवास आमची एवढी काळजी घेतात की कधी घरच्यांची आठवण येत नाही आणि आज या आश्रमात आम्हाला मुल, मुली,मित्र मायत्रीणी, सर्व भेटले असुन हाच आमचा परिवार असल्याची भावना यावेळी या अनाथांनी व्यक्त केली आहे.
हैद्राबाद येथील श्रीनिवास यांचे शिर्डीत असलेल्या द्वारकामाई वृद्धाश्रम अतिशय सुंदर आणि चांगलं पद्धतीने चालवत आहे, मात्र हे सगळे चालते ते सर्व देणगी दारांच्या जीववर मात्र आजही अनेंक लोकांना सांभाळण्याची इच्छा आहे, आणि या पेक्षाही मोठे वृद्धाश्रम बनवण्याची ईच्छा श्रीनिवास यांची आहे, मात्र हे सगळे करण्यासाठी गरज आहे आपल्या मददतीची, यामुळे दानशुर व्यक्तींनी पुढे येऊन या वृद्धाश्रमाला मदत करण्याची आज खर्यार्थाने गरज आहे.