ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करताना २ रिक्षांनी घेतला पेट - gas filling

सर्जेपुऱ्यासह शहरात अनेक ठिकाणी गॅस किट बसवलेल्या चारचाकी, तीनचाकी ऑटो-वाहनात अवैधपणे गॅस रिफिलिंग केले जाते. यात अनेकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार बिनदिक्कत उघड्यावर सुरू आहे.

रिक्षा पेटल्यानंतरचा व्हिडिओ
author img

By

Published : Apr 8, 2019, 4:16 AM IST

अहमदनगर - शहरातील सर्जेपुरा या गजबजलेल्या भागात ऑटो रिक्षामध्ये अवैधरित्या गॅस रिफिंल करून देत असताना गॅसने अचानक पेट घेतला. त्या रिक्षाच्या बाजूलाच उभे असलेल्या दुसऱ्या रिक्षानेही पेट घेतला. गॅस लिकेज झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.

रिक्षा पेटल्यानंतरचा व्हिडिओ

अग्निशमन दलाचे बंब येईपर्यंत रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाला होता. या घटनेमुळे नागरिकांत एकच घबराट उडाली होती. सुदैवाने आजूबाजूचे दुकाने आणि नागरिकांना या आगीची कोणतीही झळ बसली नाही. सर्जेपुऱ्यासह शहरात अनेक ठिकाणी गॅस किट बसवलेल्या चारचाकी, तीनचाकी ऑटो-वाहनात अवैधपणे गॅस रिफिलिंग केले जाते. यात अनेकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार बिनदिक्कत उघड्यावर सुरू आहे. याकडे पोलीस, मनपा विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी अशा अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे. रविवारी झालेल्या प्रकरणाची तोफखाना पोलीस अधिक चौकशी करत आहे.

Intro:mh_8_april_ahm_trimukhe_1_gas_filing_auto_burn_vBody:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_8_april_ahm_trimukhe_1_gas_filing_auto_burn_v

अहमदनगर- सर्जेपुरात ऑटो रिक्षात अवैध पणे गॅस रीफिलिंग करताना दोन रिक्षांनी घेतला पेट..

अहमदनगर- शहरातील सर्जेपुरा या गजबजलेल्या भागात ऑटो रिक्षात अवैध पणे गॅस रिफिल करून देत असताना गॅस ने अचानक पेट घेतला. यात गॅस भरण्यात येत असलेली एक रिक्षासह बाजूलाच उभी असलेल्या दुसऱ्या रिक्षानेही पेट घेतला. गॅस लिकेज झाल्याने ही दुर्घटना घडली. यात एक रिक्षा पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गॅस मुळे रिक्षाने पेट घेऊन उंचचउंच ज्वाला भडकल्याने नागरिकांत एकच घबराट होऊन पळापळ सुरू झाली. अग्निशमन दलाचे बंब येईस्तोवर एक रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली होती. सुदैवाने आजूबाजूचे दुकाने आणि नागरिकांना या आगीची कोणतीही झळ बसली नाही. सर्जेपुर्यात या ठिकाणासह शहरात अनेक ठिकाणी गॅस किट बसवलेल्या चारचाकी, तीनचाकी ऑटो-वाहनांत अवैधपणे गॅस रिफिलिंग केले जाते. यात संबंधितांना अवैधपणे पैसे मिळत असले किंवा गॅस रिफिल करणाऱ्यांचे काही पैसे वाचत असले तरी हा एक प्रकारे अनेकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार बिनदिक्कत उघड्यावर सुरू आहे. अवैध पणे गॅस उपलब्द होत असल्याने असले प्रकार सूरु असल्याची माहिती आहे. त्याच बरोबर पोलीस, मनपा विभागाचे या कडे सोयीस्कर दुर्लक्ष असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी असल्या अवैध गॅस रिफिलिंग सेंटर वर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होत आहे. आज झालेल्या प्रकरणी तोफखाना पोलीस अधिक चौकशी करत आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:mh_8_april_ahm_trimukhe_1_gas_filing_auto_burn_v
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.