शिर्डी ( अहमदनगर ) : साईबाबांनी आपल्या हयातीत आरोग्य सेवेला अधिक महत्त्व दिले आहे. साई संस्थान देखिल ही आरोग्य सेवा पुढे नेत आहे. गरिबांवर उपचार करण्यासाठी साईबाबा संस्थानच्या वतीने शिर्डीत मोफत रुग्णालये ( Free Hospital in Shirdi ) चालवली जाते. या रुग्णालयासाठी साईभक्त राजेश्वर यांनी साई संस्थानला पंचवीस लाख रुपयांचे चार डीडी दिले आहेत. ज्यांची एकुण किमंत एक कोटी रुपये आहे. साईभक्त राजेश्वर भावूक होवून यावेळी प्रतिक्रीया देताना म्हणतात की साईंचे साईंना अर्पण केले आहे. साईबाबांनी जे दिले ते बाबांना देण्याचे काम करतोय. साईंना दान केल्याने मनाला शांती मिळते. (Shirdi Saibaba One Crore Rupees Donation )
46 लाखाचे एक्स-रे मशीन भेट देण्याचा संकल्प : साई भक्त रोज साईंना दान देत असतात. आज एक कोटीच्या देणगी बरोबरच सुब्बा रेड्डी नावाच्या भक्ताने बाबांना 46 लाख रुपयांचे एक्स-रे मशीन भेट देण्याचा संकल्प केलाय. भक्तांनी दिलेल्या देणग्या साईभक्तांच्या सोयीसाठी आणि दैनंदिन कामासाठी वापरल्या जात असल्याची माहिती यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( Chief Executive Officer of Saibaba Sansthan ) राहुल जाधव यांनी दिली आहे. दरम्यान साई संस्थानला आज एक कोटींचे दान ( One Crore Rupees Donation ) देणा-या दानशूर भक्तांचा साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी शॉल, साई मूर्ती देवुन सन्मान केला आहे. तसेच या साईभक्तचे आभार ही मानले. ( One Crore Rupees Donation In Ahmednagar )
वर्षभरात साईबाबांच्या चरणी दान : शिर्डी येथील साईबाबांच्या दानपेटीत कोव्हिड कालावधीनंतर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असून (Sai Baba Donation) या काळात भाविकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. (Sai Baba Donation last year). देशातील अतिश्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या साईबाबा संस्थानच्या दानपेटीत (Sai Baba Donation) वर्षभरात सुमारे ३९८ कोटीपेक्षा जास्त रुपयांचे विक्रमी दान जमा झाले होते. या दरम्यान अडीच ते तीन कोटी भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले असल्याची माहिती साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे.
कोरोनानंतर वाढ : करोडो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबांच्या दानपेटीत कोव्हिड कालावधीनंतर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असून भाविकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. साईबाबांच्या दानपेटीत मागील ऑक्टोबर २०२१ पासून ते नोव्हेंबर २०२२ या वर्षभरात ३९८ कोटी रुपयांपेक्षा जास्त भरभरून दान जमा झाले असून सुमारे अडीच ते तीन कोटी भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली आहे.