ETV Bharat / state

'राजकारणातून विखे परिवाराला हद्दपार करण्याची विरोधकांची स्वप्ने कधीही पूर्ण होणार नाहीत'

गेली ५० वर्षे विखे परिवाराने राजकारण आणि समाजकारण केले आहे. पुढील ५० वर्षे आम्हाला कोणी हटवू शकत नाही.

सुजय विखे
author img

By

Published : Apr 15, 2019, 12:28 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यात अनेकजण विखे परिवाराच्या विरोधात असले तरी जनता आमच्या पाठीशी आहे. गेली ५० वर्षे विखे परिवाराने राजकारण आणि समाजकारण केले आहे. पुढील ५० वर्षे आम्हाला कोणी हटवू शकत नाही. आम्ही सामान्य गरीब समाज घटकांसोबत असल्याने आम्हाला राजकारणातून हद्दपार करणाऱ्यांची स्वप्ने कधीही पूर्ण होणार नाहीत, असा टोला डॉ. सुजय विखे यांनी विरोधकांना लगावला.

सुजय विखे यांची प्रतिक्रिया

सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. पारा ४२ अंशावर गेला आहे. तरीसुद्धा रविवारी विखे यांनी नगर तालुक्यातील अनेक गावांना धावत्या भेटी देत मतदारांना निवडून देण्याचे आवाहन केले. माझ्यासमोर विरोधक कोण आहे, किती मोठा आहे, याचा मी विचार करत नाही. ग्रामीण भागात पाण्याची असलेली गरज आणि त्याची पूर्तता झाल्यास होणारा विकास या मुद्यावर मतदारांचे प्रबोधन करत आहे. मतदारसंघात ७५० गावे आहेत. ५०० पेक्षा जास्त गावांना आतापर्यंत भेटी दिल्या आहेत. २१ एप्रिलपर्यंत राहिलेल्या गावांतील मतदारांच्या गाठी-भेटी घेणार, असे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.

युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे सध्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात गावोगावी प्रचार सभा घेत आहेत. पाणी आणि विकासाच्या मुद्यावर आपण निवडणूक लढवत असल्याचे ते प्रचारसभातून मतदारांना सांगत आहेत.

Intro:अहमदनगर- विखे परिवाराला राजकारणातून हद्दपार करण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांची स्वप्ने धुळीस मिळणार..-सुजय विखे

Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे

अहमदनगर- विखे परिवाराला राजकारणातून हद्दपार करण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांची स्वप्ने धुळीस मिळणार..-सुजय विखे

अहमदनगर- युतीचे उमेदवार डॉ सुजय विखे सध्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात गावोगावी प्रचार सभा घेत असून ही निवडणूक पाणी आणि विकास यामुद्यावर आपण लढवत असल्याचे ते प्रचारसभातून मतदारांना सांगत आहेत. सध्या उन्हाची काहिली वाढली असून पारा 42 डिग्रीवर गेला आहे. रविवारी विखे यंजू5नगर तालुक्यातील अनेक गावांना धावत्या भेटी देत मतदारांना निवडून देण्याचे आवाहन केले. माझ्यासमोर विरोधक कोण आहे, किती मोठा आहे याचा मी विचारकरत नसून ग्रामीण भागात पाण्याची असलेली गरज आणि त्याची पूर्तता झाल्यास होणारा विकास या मुद्यावर मतदारांचे प्रबोधन करत असल्याचे डॉ सुजय यांनी सांगितले. मतदारसंघात 750 गावे असून पाचशेच्या वर गावांना आता पर्यंत भेटी झाल्या असून 21 एप्रिल या प्रचाराच्या अखेरच्या दिवसां पर्यंत राहुलेल्या गावांतील मतदारांच्या गाठी-भेटी घेणार असल्याचे विखे म्हणाले.

विखे परिवाराला राजकारणातून हद्दपार करण्याचा प्रयत्न जनताच हाणून पाडेल-
-नगर जिल्ह्यात अनेक जण विखे परिवाराच्या विराधात असले तरी जनता आमच्या पाठीशी आहे. गेली पन्नास वर्षे विखे परिवाराने राजकारण आणि समाजकारण केले आहेत आणि पुढील पन्नास वर्षे आम्हाला कोणी हटवू शकत नसल्याचा विश्वास डॉ सुजय यांनी व्यक्त केला. आम्ही सामान्य गरीब समाज घटका सोबत असल्याने आम्हाला राजकारणातून हद्दपार करणाऱ्यांची स्वप्ने कधीही पूर्ण होणार नाहीत असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.

Conclusion:अहमदनगर- विखे परिवाराला राजकारणातून हद्दपार करण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांची स्वप्ने धुळीस मिळणार..-सुजय विखे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.