शिर्डी Diwali 2023 : दिवाळी निमित्तानं शिर्डी साईबाबांच्या (Shirdi Saibaba) मंदिरासह परिसरात विविध रंगांची रोषणाईसह फुलांनी आणि आकाश कंदिलांनी सजवण्यात आलाय. आज संध्याकाळी साईबाबांच्या समाधी मंदिरात पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मी कुबेर पूजनाचा सोहळाही पार पडणार आहे. दिवाळी निमित्तानं शनिवार आणि रविवारची सलग सुट्टी जोडून आल्यानं शिर्डीत आज पहाटे पासूनच साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी (Diwali Celebration In Shirdi) गर्दी झालीय.
साईबाबा मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई : दिवाळी (Diwali Festival 2023) निमित्तानं अनेक भाविक साईबाबांच्या शिर्डीत लक्ष्मी पूजन करत साईबाबा मंदिर परिसरात दीप लावून साईबाबांच्या शिर्डीत दिवाळी साजरी करतात. दिवाळी निम्मीतानं साईबाबांचं समाधी मंदिर, गुरुस्थान, द्वारकामाई, चावडी, तसेच मंदिर परिसरातील अन्य मंदिरांना आज झेंडूच्या फुलांसह आकर्षक विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलं आहे. त्याचबरोबर साईबाबा समाधी मंदिरासह परिसरात अनेक आकाश कंदीलही लावण्यात आले आहेत.
भाविकांना रांगोळ्या करत आहेत आकर्षित : दिवाळी निमित्तानं रतलम येथील अनिल सिसोदिया या साईभक्तानं साईबाबांच्या द्वारकामाईत, साईबाबा स्वयम् बसलेले असल्याची अतिशय सुंदर रांगोळी काढलीय. तसेच मंदिर परिसरातही विविध प्रकारच्या रांगोळी काढून आपली साईबाबांवर असलेली श्रद्धा अर्पित केलीय. साईबाबा संस्थानच्या वतीनं, गुरुपौर्णिमा, श्रीरामनवमी, साईबाबा पुण्यतिथी, दिवाळी, असं महत्त्वाचे उत्सव वर्षांभरात साजरे केले जातात. या उत्सवादरम्यान साईबाबांच्या विविध प्रकारच्या रांगोळ्या काढण्याचं भाग्य मला मिळत असल्याचं अनिल सिसोदिया यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलंय. दिवाळी निमित्तानं रतलम येथील सिसोदिया या भाविकांनं मंदिर परिसरात काढलेल्या विविध प्रकारच्या रांगोळ्या भाविकांना आकर्षित करत आहेत.
हेही वाचा -