ETV Bharat / state

Hivrebajar School : राज्यातील शाळा सुरू असताना हिवारेबाजारातील शाळा सुरू, जिल्हाधिकारी म्हणाले...

राज्य शासनाने 9 जानेवारीच्या रात्रीपासून राज्यात विविध निर्बंध आणले आहेत. यामध्ये राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय येत्या 16 फेब्रुवारी ( School Closed In Maharashtra ) पर्यंत बंद ठेवण्यात येईल, असा आदेश काढलेला आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजार ( Hivrebajar School Open ) येथील शाळा सुरू आहे.

author img

By

Published : Jan 13, 2022, 9:56 PM IST

Hivrebajar School Open
Hivrebajar School Open

अहमदनगर - राज्यात वाढत्या कोरोनाचा प्रार्दुभाव पाहता ( Covid Restriction In Maharashtra ) राज्य शासनाने 9 जानेवारीच्या रात्रीपासून राज्यात विविध निर्बंध आणले आहेत. यामध्ये राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय येत्या 16 फेब्रुवारी ( School Closed In Maharashtra ) पर्यंत बंद ठेवण्यात येईल, असा आदेश काढलेला आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजार ( Hivrebajar School Open ) येथील शाळा सुरू आहे. याबाबत हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार ( Popatrao Pawar On Hirebajar School ) यांनी स्पष्ट केले आहे की, गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने आम्ही शाळा सुरू ठेवली आहे.

प्रतिक्रिया

'विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त करू नका' -

शासनाने ज्या ठिकाणी कोरोनाचा पादुर्भाव कमी आहे, अशा ठिकाणच्या शाळा सुरू ठेवल्या पाहिजेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि त्यांचे भविष्य सुरक्षित राहिल, असे पोपटराव पवार यांचे म्हणणे आहे. तसेच विद्यार्थ्यांनीही शाळा बंद केली, तर आम्ही ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा दिलेला आहे.

जिल्हा प्रशासन करणार कारवाई -

एकूणच राज्यात इतरत्र शाळा बंद असताना हिवरेबाजारमधील शाळा महाविद्यालय सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने दिलेले डायरेक्शन टाळणे हे बंधनकारक आहेत. त्यानंतरही हिवरे बाजार येथील शाळा सुरू असतील, तर त्याबद्दल त्यांना सूचित करण्यात येईल. त्यांच्याकडून शाळा सुरू ठेवण्याबाबत आली तर त्यांची विनंती एसडीएमए'ने अर्थात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे येईल. प्राधिकरणाने दिलेल्या निर्णयानुसार पुढील कारवाई केली जाईल. प्राधिकरणाने जर शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले तर शाळा बंद करावी लागेल, असे जिल्हाधिकारी भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - Mumbai Bank Election : दरेकरांच्या गडाला सुरुंग, मुंबै बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.