ETV Bharat / state

धनंजय मुंडेंनी शनिदरबारात केला शांती अभिषेक - dhanajay munde news

नेवासा येथील संत वामनभाऊ सप्ताह सोहळ्यातील पुरस्कार वितरण कार्यक्रमास जाताना त्यांनी शनिशिंगणापूरला भेट दिली. तसेच उदासी महाराज मठात अभिषेक करुन दर्शन घेतले. यावेळी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री धनंजय मुंडेंनी शनिदरबारात केला शांती अभिषेक

author img

By

Published : Feb 2, 2021, 1:53 PM IST

Updated : Feb 2, 2021, 2:02 PM IST

अहमदनगर- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी शनिशिंगणापूरला भेट देऊन शनिग्रह शांती आणि तेल अभिषेक केला. नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथे संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्तहाला मुंडे यांनी हजेरी लावली होती.

धनंजय मुंडेंनी शनिदरबारात केला शांती अभिषेक

देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुंडे यांचा सत्कार

रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. आता शर्मा यांनी हे आरोप घेतल्यानंतर वातावरण शांत झाले आहे. या सर्व घडामोडींत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी मात्र त्यांची पाठराखण केली. हे सर्व प्रकरण शांत झाल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. नेवासा येथील संत वामनभाऊ सप्ताह सोहळ्यातील पुरस्कार वितरण कार्यक्रमास जाताना त्यांनी शनिशिंगणापूरला भेट दिली. तसेच उदासी महाराज मठात अभिषेक करुन दर्शन घेतले. यावेळी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते उपस्थित होते. आज दुपारी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दर्शनाचा लाभ घेतला. देवस्थान ट्रस्टच्यावतीने त्यांचा श्रीफळ तसेच प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी विश्वस्त समितीचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, चिटणीस अप्पासाहेब शेटे, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुगळे उपस्थित होते.

Last Updated : Feb 2, 2021, 2:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.