अहमदनगर - शहरापासून केवळ १८ किलोमीटरवर असलेल्या डोंगरगण येथील रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने पहाटेपासून शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. प्रभू रामचंद्रांनी वनवासात असताना २ दिवसांचा कालावधी गर्भगिरीच्या डोंगररांगेतील या स्थानांवर व्यतीत केला होता. त्यावेळी त्यांनी शिवभक्तांसाठी स्वतःच्या हाताने शिवलिंग स्थापित करून या शिवपूजा केल्याची मान्यता आहे. त्यामुळे डोंगरगण या स्थानाला मोठे पवित्र्य स्थळ मानले जाते.
याठिकाणी शहरासह, राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी आदी तालुक्यातील शिवभक्तांनी दर्शनासाठी आले होते. यावेळी डोंगरगण देवस्थानच्या वतीने भक्तांना साबुदाणा खिचडी, केळी आदींचा महाप्रसाद देण्यात येत आला.
सहावीतील शिवप्रेमी अथर्व आला शंकराच्या वेशात दर्शनाला
शहरातील केंद्रीय विद्यालयात इयत्ता सहावीत शिकणारा अथर्व सुरेश सारडा हा विद्यार्थी आपल्या आई सोबत चक्क जटाधारी शंकराच्या वेशात दर्शनासाठी आला होता. हातात त्रिशूल आणि डमरू घेऊन आलेल्या या छोट्या शंकरासोबत अनेकांना फोटो आणि सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.