ETV Bharat / state

साईबाबा समाधीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी - शिर्डी लेटेस्ट न्यूज

साईनगरीत नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. तासनतास रांगेत उभे राहत भाविकांनी नवीन वर्षात सुख-शांती आणि स्वास्थ्यासाठी साईबाबांना साकडे घातले.

साईबाबा समाधीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी

author img

By

Published : Jan 1, 2021, 12:41 PM IST

अहमदनगर - सरत्या वर्षाला निरोप देताना नववर्षांचे स्वागत मंगलमय वातावरणात करण्यासाठी लाखो साईभक्तांनी साई दरबारात हजेरी लावली. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी काल 31 डिसेंबरपासूनच भक्तांनी शिर्डीत मोठी गर्दी केली आहे. चोवीस तासांपासून शिर्डीत भक्तांची गर्दी जशास तसी दिसून येत आहे.

साईबाबा समाधीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी

2020 या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि 2021 या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काल रात्री 12 वाजेच्या सुमारास भाविकांनी साईंचे मुखदर्शन घ्यावे या उद्देशाने भाविकांनी दर्शनबारीत प्रवेश केल्याचे प्रकर्षाने जाणवले. ज्यांना मंदिरात प्रवेश करता आला नाही त्यांनी मुखदर्शन आणि साई समाधी मंदिराच्या कळसाचे दर्शन घेत धन्यता मानली. मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवल्याने 40 हजार भाविकांना रात्रीतून दर्शन घेता आले.

साईनगरीत नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. तासनतास रांगेत उभ राहत भाविकांनी नवीन वर्षात सुख-शांती आणि स्वास्थ्यासाठी साईबाबांना साकडे घातले. देश बांधवांसाठीही भाविकांनी प्रार्थना केली.

साईबाबा संस्थाननेही नवीन वर्षाचे स्वागत करताना साईसमाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी आणि गुरूस्थान मंदिराला आकर्षक फुलांनी सजवले. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली. साईनामाचा जयघोष करत भक्तांनी फटाक्यांची आतषबाजी केली. मिठाई वाटून सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करत भाविकांनी एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.