ETV Bharat / state

गांजाचे पीक घेण्याची परवानगी द्या.. शिर्डीच्या तरुण शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

author img

By

Published : May 12, 2020, 11:25 PM IST

राज्य सरकारचे आर्थिक परिस्थिती खालावल्याने उत्पन्न मिळविण्यासाठी नशेचा बाजार मांडून दारूची दुकाने सुरू केली जात आहेत. नशेबाजी हे उत्पन्नाचे साधन असेल तर राज्य सरकारने सामान्य शेतकऱ्यांना गांजाची शेती करण्याचे सरसकट परवाने द्यावी, अशी मागणी शिर्डीतील तरुण शेतकऱ्याने केली आहे.

cm uddhav thackeray
उद्धव ठाकरे

अहमदनगर - कारोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने सगळे उद्योग धंदे बंद पडले आहेत. मात्र, शेती करण्यासाठी करण्यासाठी मुभा दिलेली आहे. शेतमाल विकताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यावर सरकारने उपाययोजना करण्याऐवजी उलट उत्पन्नसाठी दारुची दुकाने सुरू करुन शेतकऱ्यांची चोष्टाच केली असल्याचा आरोप तरुण शेतकऱ्याने केला आहे. शाम गाडेकर नावाच्या तरुण शेतकऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेलद्वारे पत्र पाठवत शेतीत गांजाचे पीक घेण्यास परवानगी मागीतली आहे.

राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती खालावल्याने उत्पन्न मिळविण्यासाठी दारुची दुकाने सुरू केली जात आहेत. नशेबाजी हे उत्पन्नाचे साधन असेल तर राज्य सरकारने सामान्य शेतकऱ्यांना गांजाची शेती करण्याचे सरसकट परवाने द्यावी, ही शेती करण्याची आमची तयारी असल्याची मागणी शिर्डीजवळील निमगाव कोऱ्हाळे येथील शाम गाडेकर या तरुण शेतकऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेलद्वारे केली आहे. तसेच आपले सरकार या पोर्टलवर देखील त्याने आपली मागणी नोंदविली आहे.

गाडेकर हे अल्पभूधारक शेतकरी आहे. गोपालन आणि रिक्षा चालवून प्रपंच चालवतात दारुची दुकाने सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला हे ऐकून फार वाईट वाटले ज्या दारूमुळे शेकडो लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात तरुण पिढी व्यसनाधीन होते. दारु म्हणजे बरबादी हे माहीत असूनही सरकार दारूची दुकाने सुरू करायला परवानगी देते. दारुड्यांच्या रांगेमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतोय. कोरोनाच्या प्रसाराला चालना मिळते हे उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही सरकार दारुची दुकाने सुरू करण्याबाबत आग्रही आहे.

दुसरीकडे लॉकडाऊनच्या काळात कोट्यावधी रुपयांचा शेतमाल शेतात सडला असून, शेतकरी चार पैसै मिळविण्यासाठी आता गावोगावी भटकून उन्हातान्हात उभ राहून न परवडण्याच्या भावाने आपला शेतमाल विकत आहे. शेतकऱ्यांना कुणी वाली राहिला नाही नशेचा बाजार मांडणारे मात्र स्वतः ला अर्थव्यवस्थेचा कणा म्हणतात मग कोट्यवधी जनतेचा पोशिंदा असलेला शेतकरी कोण असा सवाल करत नशाच उत्पन्नाच साधन असेल तर आम्हालाही गांजा पिकवू द्या, अशी मागणी गाडेकर या शेतकऱ्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.