ETV Bharat / state

पोलीस वसाहतीच्या लोकार्पणास विलंब, सामाजिक कार्यकर्त्यानेच केले इमारतीचे उद्घाटन - पोलीस वसाहत शिर्डी

बांधकाम पूर्ण होऊनही केवळ उद्घाटनाचा सोपस्कार पुर्ण होण्यासाठी इमारती कुलप बंद आहेत. या इमारतीचे लोकार्पण करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी वारंवार शासनाकडे केली आहे. शासन लोकार्पण करत नसल्याने गांधीगीरी करित काळे यांनीच उद्घाटन करून कामकाजाला सुरु करण्यास पोलीसांना आमंत्रण दिले आहे.

इमारतीचे उद्घाटन
इमारतीचे उद्घाटन
author img

By

Published : Jan 28, 2022, 4:26 PM IST

अहमदनगर - आंतरराष्ट्रीय स्थान असलेल्या शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ होत असते. त्यामुळे शिर्डीच्या पोलिसांवरही अतिरिक्त ताण असतो. पोलिसांच्या सुविधेसाठी सुमारे चाळीस कोटी रुपये खर्च करत पोलीस स्टेशनची ( Shirdi Police Station ) आणि कर्मचाऱ्यांच्या राहण्यासाठी इमारत बांधण्यात आली आहे. तब्बल सहा महिन्यांचा कालावधी उलटुनही या इमारतीचे लोकार्पण न झाल्याने इमारती धूळखात पडल्या आहे. त्यामुळे इमारतीचे लोकार्पण करण्यासाठी शासनाकडे वेळ नसल्याने कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी स्वतः इमारतीचे लोकार्पण करित शिर्डी पोलिसांना ( Dedication of Shirdi Police Colony ) या इमारती कामकाज सुरू करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

सामाजिक कार्यकर्त्यानेच केले इमारतीचे उद्घाटन

सहा महिन्यांपासून लोकार्पण नाही -

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव आणि शिर्डी शहरांसाठी अद्ययावत पोलीस स्टेशनचे बांधकाम पूर्ण होऊन जवळपास सहा महीने पूर्ण झाले आहे. तसेच शिर्डीमध्ये पोलिसांसाठी घरांचे देखील बांधकाम पुर्ण झालेत. शासनाने कोट्यावधी रूपयांचा खर्च केलेला आहे. पण या वास्तूचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन होऊ न शकल्याने सध्या धुळखात आहेत. त्यामुळे तात्पूर्ती केलेल्या सोईसाठी कोपरगावला दरमाह साठ हजार रुपये तर शिर्डीला लाखभर रुपयाचे भाड मोजले जात आहे.

गांधीगिरी करत लोकार्पण -

बांधकाम पूर्ण होऊनही केवळ उद्घाटनाचा सोपस्कार पुर्ण होण्यासाठी इमारती कुलप बंद आहेत. या इमारतीचे लोकार्पण करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी वारंवार शासनाकडे केली आहे. शासन लोकार्पण करत नसल्याने गांधीगिरी करित काळे यांनीच उद्घाटन करून कामकाजाला सुरु करण्यास पोलीसांना आमंत्रण दिले आहे. तसेच याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.