ETV Bharat / state

स्वातंत्र्यदिनासह सलग दोन सुट्ट्या आल्याने भंडारदऱ्याकडे पर्यटकांची गर्दी, तीन दिवस एकेरी वाहतूकीचा प्रशासनाकडून निर्णय - भंडारदरा पर्यटन

सलग तीन दिवस सुट्टी असल्याने पर्यटनस्थळं असलेल्या अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. तसेच, रस्ते अरुंद असून, वाहतुकीची कोंडी होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, तीन दिवस एकेरी वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी दिली.

स्वातंत्र्यदिनासह सलग दोन सुट्ट्या आल्याने भंडारदऱ्याकडे पर्यटकांची गर्दी

author img

By

Published : Aug 14, 2021, 3:37 PM IST

अहमदनगर (शिर्डी) - स्वातंत्र्यदिन दरम्यान सलग तीन दिवस सुट्टी असल्याने पर्यटनस्थळं असलेल्या अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. तसेच, रस्ते अरुंद असून, वाहतुकीची कोंडी होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, तीन दिवस एकेरी वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी दिली.

स्वातंत्र्यदिनासह सलग दोन सुट्ट्या आल्याने भंडारदऱ्याकडे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर या भागात काही नियम लागू करण्यात आले आहेत. त्याबाबत माहिती देताना, पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे

'सलग तीन दिवस सुट्टीमुळे पर्यटकांची भंडार दऱ्यात गर्दी'

अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड, कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या मुळा आणि भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंत घेतली आहे. सध्या तुरळक श्रावण सरीचा बरसत आहेत. मुळा प्रवरा पाणलोटात ऊन-पावसाचा खेळ सुरू झाल्याने पर्यटकांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. त्यात स्वतंत्र्यदिन दरम्यान तीन दिवस सलग सुट्टीमुळे पर्यटकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन, राजूर पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. आज दि 14 पासून 16 ऑगस्टपर्यंत भंडारदरा धरणाकडे जाण्याच्या रसत्यावर एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. शनिवार दिनांक १४ सकाळी ८ वाजता राजूर पासून भंडार दऱ्याकडे जाण्यासाठी रंधा फाटा येथून प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर, भंडारदऱ्याला जाण्यासाठी वाकी फाटा, वारंघुशी फाटा येथून प्रवेश करता येणार आहे. तसेच, एकरी वाहतूक मार्ग-वारंघुशी फाटा, वाकी फाटा, चिंचोडी फाटा, यश रिसॉर्ट, शेंडी, भंडारदरा धरण, स्पिलवे गेट, भंडारदरा गाव, गुहिरे, रंधा मार्ग इच्छित स्थळी जावू शकणार आहेत.

'भंडारदरा पर्यटन स्थळ गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या'

निसर्ग सौंदर्याचा पर्यटक आनंद घेत आहेत. कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार टाळण्यासाठी तशा सूचना करण्यात येणार असून, सोबत मद्याच्या बाटल्या आढळल्यास जप्त करण्यात येणार आहेत. राजूर पोलीस स्टेशनचे वाहन परिसरात सतत फिरते ठेवण्यात येणार आहे. पर्यटकांनी पोलीस कर्मचारी व स्थानिक व्यावसायिकांना सहकार्य करून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. याची खबरदारी घेऊन पर्यटनाचा मनमुराद आस्वाद घ्यावा. तसेच, भंडारदरा पर्यटन स्थळ गालबोट लागून बदनाम होणार नाही. याबाबत काळजी घ्यावी. असे, आहवान भंडारदरा येथील सरपंच दिलीपराव भांगरे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.