ETV Bharat / state

नगरमध्ये 'सैराट'.. आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी व जावयाला घरात कोंडून पेटवले

मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलगी व जावई या पती-पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याची घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथे घडली आहे.

नगरमध्ये 'सैराट'.. आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी व जावयाला घरात कोंडून पेटवले
author img

By

Published : May 6, 2019, 12:15 PM IST

Updated : May 6, 2019, 10:06 PM IST

अहमदनगर - मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलगी व जावई या पती-पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याची घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथे घडली आहे. शनिवारी घडलेल्या या जळीत कांडातील पती-पत्नी दोघेही पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना पत्नी रुख्मिणी रणसिंह हिचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. तर पती मंगेश रणसिंह यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक जण फरार आहे.

नगरमध्ये 'सैराट'.. आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी व जावयाला घरात कोंडून पेटवले

याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, गवंडी व्यवसाय करणारे मंगेश चंद्रकांत रणसिंग (वय 23) हे 1 मे रोजी त्यांची पत्नी रुक्मिणी मंगेश रणसिंग ( वय 19) यांना भेटण्यासाठी निघोज येथे वाघाचा वाडा येथे गेले होते. त्यापूर्वी या पती पत्नीचे स्वयंपाक करण्यावरून भांडणे झाले होते. म्हणून रुक्मिणी ही माहेरी निघून गेली होती.

मंगेश रूक्मीणीला भेटण्यासाठी घरी गेल्यावर रुक्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया, मामा घनशाम मोहन राणेज, काका सुरेंद्रकुमार रामफल भरतिया या तिघांनी रूक्मिणीला मंगेश बरोबर न पाठवता त्याला मारहाण केली. यावेळी रूक्मिणी मात्र मंगेश बरोबर जाण्यास निघाली असता तिघांनी या पती-पत्नीला घरात कोंडून त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले व घराला कूलूप लावून बाहेर निघून गेले. जोडप्याचा आरडाओरडा ऐकून शेजारच्या लोकांनी त्यांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली.

मंगेश व रुक्मिणी यांचे सहा महिन्यापूर्वी लग्न झाले होते. रुक्मिणीचे वडील, काका व मामा यांचा लग्नाला विरोध होता. म्हणून त्यांचा काटा काढण्याचा या तिघांचा प्रयत्न होता. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी मंगेश व रुक्मिणी यांचा जबाब रविवारी 4 मे रोजी घेतला असून त्यात या पती-पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. ही बाब स्पष्ट झाली आहे.

पोलिसांनी मृत रुख्मिणी याचे मामा घनशाम राणेंज व काका सुरेंद्रकुमार भरतिया यांना ताब्यात घेतले असून रुक्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया फरार आहे. पोलीस उपअधीक्षक कलानिया यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.

Intro:अहमदनगर- प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्याला घरात बंद करून दिले पेटवून, पत्नीचा मृत्यू-पतीवर उपचार सुरू.Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_5_may_ahm_trimukhe_1_marrige_burn_matter_v

अहमदनगर- प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्याला घरात बंद करून दिले पेटवून, पत्नीचा मृत्यू-पतीवर उपचार सुरू.

अहमदनगर- मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणुन मुलगी व जावई या पती-पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याची घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथे झाली आहे. शनिवारी घडलेल्या या जळीत कांडातील पती पत्नी दोघेही पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना पत्नी रुख्मिनी रणसिंग हिचा सोमवारी पहाटे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर पती मंगेश रणसिंगयांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असुन एक जण फरार आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की निघोज येथे गवंडी व्यवसाय करणारे मंगेश चंद्रकांत रणसिंग (वय वर्षे 23) हे दि. 1 मे रोजी त्यांची पत्नी रुक्मिणी मंगेश रणसिंग( वय वर्षे 19) यांना भेटण्यासाठी निघोज येथे वाघाचा वाडा येथे गेले होते. त्यापूर्वी या पतीतत्नीचे स्वयंपाक करण्यावरून भांडणे झाले होते. म्हणून रुक्मिणी ही माहेरी निघून गेली होती. मंगेश रूक्मीणीला भेटण्यासाठी घरी गेल्यावर रुक्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया, मामा घनशाम मोहन राणेंज, काका सुरेंद्रकुमार रामफल भरतिया या तिघांनी रूक्मीणीला मंगेश बरोबर न पाठवता त्याला मारहाण केली. यावेळी रूक्मीणी मात्र मंगेश बरोबर जाण्यास निघाली असता वरील तिघांनी या पतीतत्नीला घरात कोंडून त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. व घराला कूलूप लावून निघून गेले. मात्र आरडाओरडा ऐकून शेजारच्या लोकांनी त्यांना बाहेर काढले व रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. मंगेश व रुक्मिणी यांचे सहा महिन्यापूर्वी लग्न झाले होते. तीचे वडील काका व मामा यांचा लग्नाला विरोध होता. म्हणून एक ना एक दिवस त्यांचा काटा काढण्याचा या तिघांचा प्रयत्न होता. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी मंगेश व रुक्मिणी यांचा जबाब काल दि. 4 रोजी घेतला असून त्यात या पतीतत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला ही बाब स्पष्ट झाली आहे. पोलीसांनी तीचा मामा घनशाम राणेंज व काका सुरेंद्रकुमार भरतिया यांना ताब्यात घेतले असून रुक्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया हा फरार झाला आहे. पोलीस उपअधीक्षक कलानिया यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली व उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल श्रीनाथ गवळी व पोलीस तपास करीत आहेत.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्याला घरात बंद करून दिले पेटवून, पत्नीचा मृत्यू-पतीवर उपचार सुरू.
Last Updated : May 6, 2019, 10:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.