ETV Bharat / state

सलाम! नगरमध्ये कर्तव्यदक्ष मुलाने केली भाजीपाला विक्रेत्या आईवर कारवाई - अहमदनगर कोरोना न्यूज

अहमदनगर शहरात तीन दिवसांपूर्वी झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत सर्वच नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार पालिका कर्मचाऱ्यांचे पथक बाजार तळात आले असता नियम मोडुन दुकानदारी करणाऱ्यांचे शटर फटाफट बंद झाले. भाजी विक्रेत्या महिला पुढे जाऊन गाडी थांबली. तुम्हाला गावभर फिरून भाजी विकायला परवानगी असून बसायला नाही असे सांगत पालिका कर्मचारी रशीद शेख याने स्वत:च्या आईवरच कारवाई केली आहे.

corona positive news
कर्तव्यदक्ष पालिका कर्मचाऱ्याची भाजीपाला विक्रेत्या आईवर कारवाई
author img

By

Published : May 8, 2021, 12:25 PM IST

Updated : May 8, 2021, 1:26 PM IST

अहमदनगर - कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी पालिका प्रशासन गर्दी नियंत्रण, नियमांची अंमलबजावणी व जनजागृती मोहीमेत व्यस्त आहे. रस्त्यावर बसून भाजीपाला विकण्यासाठी सध्या मनाई असून नियम पायदळी तुडवून भाजी विक्री करत असलेल्या आईचा सर्व भाजीपाला पालिकेत कर्तव्यावर असलेल्या पुत्राने उचलून घंटागाडीत टाकून कारवाई केली. भावनेपेक्षा व नात्यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजणाऱ्या रशीद शेख या कर्मचाऱ्याचे शहरातून कौतुक होत असून तहसीलदार, मुख्याधिकारी यांनी सुद्धा त्याचे कौतुक केले आहे.

कर्तव्यदक्ष पालिका कर्मचाऱ्याची भाजीपाला विक्रेत्या आईवर कारवाई

कोरोना काळात भावनेपेक्षा कर्तव्य महत्वाचे -

पालिका कर्मचाऱ्यांची टीम सकाळी सात ते अकरा या वेळेत फिरून नियम मोडणारे विक्रेते, व्यापारी, फेरीवाले आदींविरुद्ध कारवाई करते. बाजारतळावर दररोजचा भाजी बाजार भरतो. तीन दिवसांपूर्वी झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत सर्वच बाबतीत नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेत पालिका प्रशासनाला तसा आदेश दिला. त्यानुसार पालिका कर्मचाऱ्यांचे पथक बाजार तळात आले. याठिकाणी पालिका कर्मचाऱ्याने भाजी विकत असलेल्या स्वत:च्या आईवर कारवाई करत भाज्यांनी भरलेले सर्व सामान उचलून घंटागाडी टाकले. यामध्ये बटाटे, गवार, मेथी, कांदे, अन्य पालेभाज्या, शेवगा वगैरे भाज्या होत्या. मुलाची कारवाई पाहून आई असलेली भाजीविक्रेती महिला निमूटपणे बाजूला जाऊन मुलाचे कर्तव्य कौतुकाने बघत होती. काही वेळातच हा विषय शहरभर समजला सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव सुरु झाला.

कारवाई केलेल्या मुलाचे आईला कौतुकच-

शहरात कारवाईसाठी फिरताना शटर उघडून गुपचूप व्यवसाय करणारे व्यापारी निराधार आरोप करतात टीका करतात. काम करताना आपण कोणाचाही दबाव मानत नाही. मी माझे काम अधिक नेटाने करणार आहे. माझ्या आईने कायदा मोडला तरी कर्मचारी म्हणून दुर्लक्ष करणार नाही. घरी गेल्यावर पुत्र या नात्याने तिची समजूत काढेन पण ड्रेस वर असताना नाही. दुपारी घरी जेवायला गेल्यावर आईने सुद्धा कौतुक करत स्वतःला जप, मास्क लाव, आता मी भाजी विकणार नाही असे सांगत माझे कौतुक केले व कर्तव्य श्रेष्ठ असल्याचे सांगितले.

रशीद शेख यांचा आदर्श घ्या -

तहसीलदार श्याम वाडकर, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनीही शेख यांच्या कर्तव्य भावनेचे कौतुक करत सर्व कर्मचाऱ्यांनी नेटाने काम करून शहर लवकर कसे कोरोना मुक्त होईल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. अनेक शहरात नगरसेवक, वरिष्ठ अधिकारी हे कारवाई पाठकालाच अडथळा ठरत असतात. कारवाई करत असताना कर्मचारी, अधिकाऱ्यांना फोन करून दबाव आणला जातो. मात्र कोरोनाचे संकट हे भयावह आहे. रुग्ण वाढत असताना अनेकांचे मृत्यू होत आहेत. कोरोना जात, पात, धर्म, राजकिय, गरीब-श्रीमंत असे काहीही पाहत नाही, चुकीला माफी नाही या न्यायाने कोरोना फैलावत असताना आता प्रत्येकाने स्वतःच शासनाने सांगितले नियम स्वयंमस्फूर्तीने पाळून कोरोनाचे युद्ध जिंकले पाहिजे हाच संदेश रशीद शेख यांनी कृतीतून दिला आहे.

हेही वाचा - मुंबईत दररोज ५० हजारापेक्षा जास्त परप्रांतीय मजूर होत आहेत दाखल

Last Updated : May 8, 2021, 1:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.