ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये तिसऱ्या मजल्यावरून पडलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू - ahmednagar corona patient news

हरातील गुलमोहर रोडवरील सुरभी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णाने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, त्याचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती.

corona-positive-patient-try-to-attempt-suicide-at-covid-hospital-in-ahmednagar
अहमदनगरमध्ये तिसऱ्या मजल्यावरून पडलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू
author img

By

Published : Aug 25, 2020, 1:31 PM IST

Updated : Aug 25, 2020, 2:28 PM IST

अहमदनगर - शहरातील गुलमोहर रोडवरील सुरभी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेला एका कोरोनाबाधिताने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णाने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती.

अहमदनगरमध्ये तिसऱ्या मजल्यावरून पडलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू
रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने सदर रुग्णाला जबर मार लागला होता. त्याच्यावर सुरभी रुग्णालयामध्येच उपचार सुरू होते. सदर 32 वर्षीय रुग्ण हा पाथर्डी तालुक्यातील आहे. त्याच्यावर मागील दहा दिवसांपासून शिरूर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. सोमवारी रात्री तो सुरभी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झाला होता. पहाटे सव्वातीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास त्याने पळत येऊन रुग्णालयाची काच तोडून थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. ही घटना निदर्शनास येताच रुग्णालयामधील डॉक्टरांनी तत्काळ त्याच्यावर उपचार सुरू केले. खाली पडल्याने हा रुग्ण गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण पाथर्डी तालुक्यातील असून त्याच्यावर मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

Last Updated : Aug 25, 2020, 2:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.