ETV Bharat / state

Sujay Vikhe Patil : आरक्षणाच्या मुद्द्यावर सामूहिकपणे काय करता येईल याचा विचार करण्याची गरज - सुजय विखे पाटील

Sujay Vikhe Patil : आरक्षणाच्या बाबतीत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यापेक्षा पक्षीय जोडे बाजूला ठेवावे आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर (Maratha reservation issue) सामूहिकपणे काय करता येईल याचा विचार करण्याची गरज आहे, असं मत अहमदनगरचे भाजपा खासदार (Ahmednagar BJP MP) सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

Sujay Vikhe Patil
सुजय विखे पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 8:00 PM IST

मराठा आरक्षण आणि आंदोलनाच्या मुद्द्यावर सुजय विखे पाटील यांची प्रतिक्रिया

अहमदनगर Sujay Vikhe Patil: आरक्षणाच्या प्रश्नावर कोणताही राजकीय प्रतिनिधी सध्या बोलायला घाबरत आहे. एखादा व्यक्ती सामंजस्याने बोलायला गेला तरी त्याचा एखादा शब्द काढून विपर्यास केला जातोय. (Sujay Vikhe Patil On Maratha reservation) एखादी व्यक्ती राज्य सरकारकडे किंवा न्यायालयात बाब मांडायला गेला तरी त्याचा विपर्यास केला जातो. म्हणून आता सगळ्यांची भूमिका आणि सगळ्यांना आमचा पाठिंबा आहे हेच वक्तव्य आहे. दुर्दैवाने आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यामुळे कोणी मार्ग सांगायलाही आता तयार नाहीये, असं भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील म्हणाले.

11 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र : मराठा समाजाला आरक्षण मिळेल हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे. त्यांनी मांडलेल्या भूमिकेला सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. 11 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिली जातायेत. त्यामुळे न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून शांततेच्या मार्गाने पुढे जावं लागेल असं मत भाजपाचे खासदार सुजय विखे यांनी मांडलं. राहाता आणि शिर्डी शहरात सुरू असलेल्या मराठा आमरण उपोषणकर्त्यांशी सुजय विखे यांनी भेट दिल्यानंतर ते बोलत होते. मी एक मराठा आणि डॉक्टर या नात्याने राहाता शिर्डी येथील आमरण उपोषणास बसलेल्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे, असं ते म्हणाले.

पाठिंबा सर्वांचाच पण बोलायला कुणी धजावेना : सर्वच लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. परंतु, आज जाहीर भाष्य करायला सरपंच पदापासून ते सर्वच पदावर असलेले नेते बोलायला पुढे येत नाहीत. त्यामुळे लक्ष वेधून या प्रश्नावर प्रतिक्रिया व्यक्त करताना कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणं आवश्यक असल्याचे विखे पाटील म्हणाले. आरक्षणाच्या बाबतीत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यापेक्षा पक्षीय जोडे बाजूला ठेवून आरक्षणाच्या मुद्द्यावर सामूहिकपणे काय करता येईल याचा विचार करण्याची गरज असल्याचे सुजय विखेंनी सांगितलं.

हेही वाचा:

  1. Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरूच राहणार, आजपासून पाणीही वर्ज
  2. Maratha Protest : मराठा आरक्षणाचं लोन मंत्रालय आणि विधानभवनापर्यंत; दगाफटका होण्याची शक्यता - सुप्रिया सुळे
  3. Maratha Protest : मराठा आंदोलकांनी अजित पवार, उदय सामंताचं बॅनर फाडलं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.