अहमदनगर- शिर्डीतील 20 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याचं कारणही तसेच असल्यानं या प्रकारानं परिसरात एकच खळबळ उडली आहे.
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. किरण अरुण ठोंबरे असं त्याचं नाव असून तो अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. सापडलेल्या चिठ्ठीत त्याने शिक्षणाचा कंटाळा आल्याने आत्महत्या करत असून माझ्या मृत्यू प्रकरणी कोणालाही दोषी धरू नका, असे लिहीले आहे.
किरणने आत्महत्या केल्याने गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. शिर्डी पोलिसांनी या संदर्भात अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. किरणचं पार्थीव हाता ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत.