ETV Bharat / state

निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे दीड वर्षात पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांची संगमनेरमध्ये घोषणा - Nilwande Dam news

निळवंडे धरणासाठी या सरकारने मोठा निधी दिला आणि विखे यांच्या मागणी प्रमाणे निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे येत्या दीड वर्षात पुर्ण केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी संगमनेरमधील जनतेला दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Sep 13, 2019, 6:07 PM IST

Updated : Sep 13, 2019, 9:27 PM IST

अहमदनगर - उत्तर नगर जिल्ह्याच्या पाच तालुक्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे दीड वर्षात पूर्ण करुन शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते आज संगमनेरमध्ये महाजनादेश यात्रेनिमित्त आयोजीत सभेत बोलत होते.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा आजपासून, नगरमधून प्रारंभ

भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले शहरापासून झाली. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपत आलेल्या पिचडांच्या मतदार संघात पहिली सभा घेत भाजपने आणि पिचडांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत यात्रेची सुरुवात केली. त्यानंतर संगमनेर येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या घराजवळील जाणता राजा मैदानावर आयोजीत जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी शहरात तुम्ही जोरदार स्वागत केले, याचा अर्थ हवेचा रोख बदलत आहे, असे वक्तव्य केले.

संगमनेरमध्ये महाजनादेश यात्रेनिमित्त आयोजीत सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हेही वाचा - शिवसेनेची यादी आपणच तयार करा, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

अकोले आणि संगमनेर येथील सभेत मुख्यमंत्री बाळासाहेब थोरांतांवर काय टीका करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी थोरातांवर जाहीर टीका न करता केवळ निळवंडे धरणासाठी या सरकारने मोठा निधी दिला आणि विखे यांच्या मागणी प्रमाणे निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे येत्या दीड वर्षात पुर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच थोरातांनी संगमनेर शहराच्या पिण्याच्या पाण्याची निळवंडे धरणावरुन आणलेली पाईप लाईन कायम दुष्काळी पट्टा असलेल्या तळेगाव दिघे भागात नेण्यासाठीच्या सर्वेक्षणाची घोषणा केली. यामुळे थोरातांच्या मतदार संघातल्या या भागातील मते आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला, असे दिसून आले.

हेही वाचा - ठरलं..! उदयनराजेंच्या हाती 'कमळ', मोदींच्या उपस्थितीत दिल्लीत उद्या भाजपप्रवेश

संगमनेरमधील सभेत विखे पिता-पुत्रांनी थोरातांवर जोरदार टीका केली. संगमनेर तालुक्यातील दादागिरीची आणि मुठभर लोकांच्या हातात केंद्रीत झालेल्या सत्तेतून लोकांना बाहेर काढायचे असल्याचे विखेंनी म्हटले.

Intro:Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_उत्तर नगर जिल्ह्याच्या पाच तालुक्यांच्या द्रुष्टीने महत्वाचा असलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे दिड वर्षात पुर्ण करत शेतकर्या़च्या शेतीत पाणी पोहचेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संगमनेर मध्ये महाजनादेश यात्रेच्या दरम्यान आयोजीत सभेत दिलाय....

VO_महाजनादेश यात्रेच्या तीसर्या टप्याची सुरवात आज नगर जिल्ह्यातील अकोले शहरा पासुन सुरवात करण्यात आली आहे.राष्ट्रवादी कॉग्रेस सोडुन भाजपात आलेल्या पिचडांच्या मतदीर संघात पहीली सभा घेत भाजपाने आणि पिचडांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत यात्रेची सुरवात केली आहे त्या नंतर कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या घरा शेजारील जानता राजा मौदानावर आयोजीत जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी संगमनेर शहरात तुम्ही जोरदार स्वागत केले याचा अर्थ हवेचा रोख बदलोतोय अब हवा करेंगी रोषणी का फैसला जिस दिये मे दान होगी वही रोषण होगा अशी काव्य पक्ती करत परीवक्तनाची झलक मला बघावयास मिळतेय असा विश्वास व्यक्त केलाय....

साऊंड BITE_ देवेंद्र फडणवीस

VO_अहमदनगर जिल्ह्यातील आजच्या दौर्यातील अकोले आणि. संगमनेर येथील सभेत मुख्यमंत्री बाळासाहेब थोरांतान वक काय. टिका करणार या कडे सगळ्यांच लक्ष लागल होत मात्र थोरातां वर जाहीर टिरा न करता केवळ निळवंडे धरणासाठी या सरकारने मोठा निधी दिला आहे आणि राधाकृष्ण विखे यांच्या मागणी प्रमाणे निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे येत्या दिड वर्षात पुर्ण तेली जाईल तसेच बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहराच्या पिण्याच्या पाण्याची निळवंडे धरणा वरुन आणलेली पाईप लाईन कायम दुष्काळी पट्टा असलेल्या तळेगाव दिघे भागात नेण्या साठीच्या सर्वेक्षणाची घोषणा करत भाजपाने थोरातांच्या मतदार संघातल्या या भागातील मते आपल्या कडे वळविण्याच प्रयत्न केलाय....

Sound Bite -- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

VO_संगमनेरातील सभेच विखे पिता पुत्रांनी बाळासाहेब थोरांन वर जोरदार टिका केली आहे. संगमनेर तालुक्यातील दादागीरीची आणि मुठभर लोकांच्या हातात केंद्रीत झालेल्या सत्तेतुन लेकांना बाहेर काढायच असल्याच विखेंनी म्हटलय....Body:mh_ahm_shirdi cm mahajanadesh yata_13_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi cm mahajanadesh yata_13_visuals_bite_mh10010
Last Updated : Sep 13, 2019, 9:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.