अहमदनगर - जिल्ह्यातील अकोले तहसील कार्यालयातील अव्वल कारकूनला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. निवृत्ती भालचिम असे या कारकूनाचे नाव असून अहमदनगर लाचलूचपत विभागाने ही कारवाई केली आहे.
तक्रारदाराने नव्याने जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीच्या फेरफारमध्ये झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी आरोपी निवृत्ती यांनी तक्रारदाराकडे ४ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून निवृत्तीला अटक केली.