शिर्डी: कोपरगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊसाने चांगलंच थैमान घातला असुन बुधवारपासुन रात्री पुन्हा एकदा संपूर्ण तालुक्यात ढग फुटी सदृश पाऊस Cloud bursting rain झाल्याने सर्व ओढे. नाले ओसंडून वाहू लागले आहे.
वाहून जाणाऱ्या युवकाचे प्राण वाचविले कोपरगाव वैजापूर या राज्य मार्गावरील नऊचारी लगत वाहणारा ढामरा नाला देखील आपली पातळी सोडून वाहू लागला. पुलावरून २ ते ३ फूट पाणी वाहत आहे. यामुळे हा रस्ता गुरुवारी सकाळी वाहतुकीसाठी बंद झाला आहे. परंतु या रस्त्यावर आपला जीव धोक्यात घालत काही दुचाकी स्वार जात असताना यातच शिंगणापूर रेल्वे स्टेशन येथे राहणारा एक शेतकरी युवक दुचाकीवर पूल ओलडतांना असताना पाण्याचा अंदाज न आल्याने अचानकपणे त्याचा तोल जाऊन खोल पाण्याचा प्रवाहात पडला असता. तेथे उभ्या आसलेल्या स्थानिक युवक प्रसाद संवत्सरकर सचिन संवत्सरकर, सैरभ संवत्सरकर, अतुल संवत्सरकर आदी युवकांनी तत्काळ आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्याच्या प्रवाहात उड्या घेत त्या वाहून जाणाऱ्या युवकाचे प्राण वाचविले. परंतु यात त्या युवकाची दुचाकी पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळत आहे.
परिसरात या तरुणांचे कौतुक सदर वाहून जाणाऱ्या युवकाचे नाव प्रसाद सुरेश दहाड दे वय अंदाजे 22 वर्ष असल्याची समजत आहे. या सदरची माहिती शिंगणापूर गावचे पोलीस पाटील सविता प्रशांत आढाव यांनी दिली आहे. जवळच उभ्या असलेल्या तरुणांनी वाहून जाणाऱ्या तरुणाचे जीव वाचवतानाचा सर्व व्हिडिओ कॅमेरात कैद केला असून सध्या ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Viral on social media होत आहे. स्थानिक तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे प्रसादचे प्राण वाचले आहे त्यामुळे परिसरात या तरुणांचे कौतुक केले जात आहे.