अहमदनगर - सामूहिक बलात्काराची फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित महिलेसह पतीलाही बांधून विवस्त्र करून पेट्रोल टाकून अमानूष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरात घडली होती. याप्रकरणी पीडिता आणि पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या २ अज्ञात पोलिसांसह एकूण १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सन २०१६ मध्ये अत्याचार होऊन अद्याप न्याय न मिळालेल्या पीडितेस आणि तिच्या पतीला विवस्त्र करत अंगावर पेट्रोल टाकत अमानुषपणे मारहाण करणाऱ्या एकूण १० आरोपींविरोधात अहमदनगर पोलिसांनी अखेर रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींमध्ये पीडितेने २ अज्ञात पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. याबाबत रात्री महिला दक्षता समितीच्या सदस्यांच्या उपस्थित गृह विभागाच्या उपअधीक्षका प्रांजल सोनवणे यांनी पीडिता आणि तिच्या पतीचा पंचासमक्ष जबाब नोंदवून घेतला आहे. तसेच आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न, अपहरण, लैंगिक शोषण आदी कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - हे कायद्याचे राज्य आहे का.. ? बलात्कार पीडितेला पतीसह विवस्त्र करून अमानुष मारहाण, अंगावर ओतले पेट्रोल
हेही वाचा - प्रवरा नदीत उडी मारून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, नागरिकांनी वाचवले