ETV Bharat / state

कर्जतमधील पवार-शाह यांच्या सभेवर पावसाचे सावट - अहमदनगर विधानसभा निवडणूक 2019

सभेसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी अंथरण्यात आलेल्या चटयासुद्धा पाण्याखाली गेल्या आहेत. तर मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे.

पवार-शाह यांच्या सभेवर पावसाचे सावट
author img

By

Published : Oct 19, 2019, 12:00 PM IST

अहमदनगर - राज्यात लक्षवेधी असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघात आज राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. त्यादृष्टीने आयोजकांनी सभेची जोरदार तयारीही केली आहे. मात्र, मध्यरात्रीपासूनच कर्जतसह नगर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे सभेच्या ठिकाणी पाणी साचले आहे.

पवार-शाह यांच्या सभेवर पावसाचे सावट

हेही वाचा - कर्जतमध्ये आज पवार-शाह आमने-सामने

सभेसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी अंथरण्यात आलेल्या चटयासुद्धा पाण्याखाली गेल्या आहेत. तर मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. दरम्यान, शरद पवार या सभेसाठी साडेअकरा वाजेपर्यंत येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. ढगाळ हवामानामुळे हवाई मार्गाने येणाऱ्या नेत्यांना अडचणी येण्याचा संभव आहे. मात्र, या दोन्ही सभा पार पडाव्यात, अशी उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

Intro:अहमदनगर- कर्जत संततधार, पवार-शाह सभांवर पावसाचे सावट..

Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_karjat_rally_rain_bite_7204297

अहमदनगर- कर्जत संततधार, पवार-शाह सभांवर पावसाचे सावट..

अहमदनगर- राज्यात लक्षवेधी असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघात आज प्रचार सांगतेच्या दिवशी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा आज कर्जत मध्ये येत असून या दोघांच्याही जाहीर सभांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यादृष्टीने आयोजकांनी जोरदार तयारी केली असतानाच रात्र घरापासून कर्जत सह नगर जिल्ह्यात संततधार सुरू असून कर्जत मध्ये होत असलेल्या पावसामुळे सभा होत असलेल्या ठिकाणी पाणी साचले आहे. सभेसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी अंथरण्यात आलेल्या चटाया सुद्धा पाण्याखाली गेलेल्या आहेत. तर मैदान परिसरामध्ये अनेक ठिकाणी चिखल झाल्याचे चित्र आहे. दरम्यान शरद पवार या सभेसाठी साडेअकरा वाजेपर्यंत येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. ढगाळ हवामानामुळे हवाई मार्गाने येणाऱ्या नेत्यांना अडचणी येण्याचा संभव आहे मात्र या दोन्ही सभा पार पडाव्यात अशी उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची एकुणच इच्छा दिसून येते.

-राजेंद्र मुख्य, अहमदनगर

Conclusion:अहमदनगर- कर्जत संततधार, पवार-शाह सभांवर पावसाचे सावट..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.