ETV Bharat / state

शिर्डी : साई मंदिर कलशारोहणाचा वर्धापन दिन साजरा

साई मंदिर कलशारोहणाचा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला. २९ सप्टेंबर १९५२ रोजी पूर्णवादाचे जनक डॉ रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या हस्ते साई मंदिरावर सुवर्ण कलशारोहण करण्यात आले होते.

Sai Mandir Kalsharohan
साई मंदिर कलशारोहण
author img

By

Published : Sep 29, 2021, 8:36 PM IST

Updated : Sep 29, 2021, 10:12 PM IST

शिर्डी(अहमदनगर) - साई मंदिर कलशारोहणाचा वर्धापन दिन आज डॉ. पारनेरकरांच्या पादुका पूजन व सुवर्ण कलशाच्या प्रतिमेच्या पूजनाने साजरा करण्यात आला. २९ सप्टेंबर १९५२ रोजी पूर्णवादाचे जनक डॉ रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या हस्ते साई मंदिरावर सुवर्ण कलशारोहण करण्यात आले होते. आज या घटनेला ६९ वर्षं झाली आहेत, साई मंदिराला यामुळे पूर्णत्व आले.

माहिती देताना सचिन तांबे

हेही वाचा - साईंची शिर्डी : कोरोनापूर्वी आणि नंतरची

  • या वर्षीपासून कलशारोहण स्मृतिदिन साजरा होणार -

या सुवर्ण क्षणाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या वर्षीपासून कलशारोहण स्मृतिदिन साजरा करण्यात येणार आहे. यासाठी श्री पारनेरकर गुरुसेवा मंडळाचे अध्यक्ष गणेशदादा पारनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील नारायण जोशी व शिर्डीतील संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सुवर्णकलशाची प्रतिकृती बनवण्यात आली होती.

साईबाबा समवेत असणाऱ्या सर्व घटना व समकालीन संतांचा अभ्यास करून जतन केले पाहिजे असे मत नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी व्यक्त केले. दासगणू महाराज जयंती आम्हीं साजरी केली, आता तो कार्यक्रम संस्थान करत आहे. भविष्यात हा कलशारोहण स्मृतिदिनसुद्धा संस्थान करेल, अशी अपेक्षाही सचिन तांबे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - अहमदनगर : शिर्डीतील साई आश्रया अनाथालयातील मुलींचा रॅम्पवॉक बघून थक्क व्हाल!

यावेळी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपनगराध्यक्ष सचिन कोते, नगरसेवक अशोक गोंदकर, अजित पारख, सचिन शिंदे, सुरेन्द्र महाले,संदीप पारख, सर्जेराव कोते, प्रमोद गोंदकर, सुनील परदेशी, वैभव कोते, विनायक रत्नपारखी, केदार आप्पा, सुधीर कुलकर्णी, हणमंतराव कुलकर्णी, सुधीर गुलदगड, अरविंद पाटील, सोनटक्के, सिद्धेश्वर लावर आदी उपस्थित होते.

Last Updated : Sep 29, 2021, 10:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.