शिर्डी आज देशभरात श्रीकृष्ण जन्माष्ठमीचा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा केला जात आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदीरातही Shirdi Saibaba Temple हा उत्सव मोठया श्रध्देने आणि उत्साहात साजरा करण्यात येत आहे. साईबाबांच्या मंदीरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मुर्ती ठेवून बाळ कृष्णाचे गुणगान गायले जात आहे. साई मंदीरात किर्तन पार पडल्यावर रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा Shri Krishna Janmashtami होऊन शेजआरती करण्यात आली आहे.
श्रीकृष्ण जन्मोत्सव किर्तन साईबाबांच्या हयातीपासून शिर्डीत श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. ती प्रथा पुढे साईबाबा संस्थानने पुढे चालू ठेवली आहे. गुरुवार आणि अष्टमी हा योग जुळून आला आहे. गोकुळ अष्टमीच्या निम्मीताने गुरुवारी रात्री साडे सात ते साडे आठ या एक तासात निमंत्रित कलाकार साई सामाधी समोरील स्टेजवर आपली कला सादर करत साईचरणी हजेरी लावली. त्यानंतर दर गुरुवारी निघणारा साईबाबांचा पालखी Saibaba Palkhi सोहळा पार पडला. रात्री दहा वाजता साईसमाधी समोरील स्टेजवर श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे किर्तन पार पडले. बरोबर बाराच्या ठोक्याला आकर्षक फुलांनी सजविलेल्या चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मुर्ती ठेवत भाग्यश्री बानायत यांनी पाळण्याची दोरी ओढत श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला. एरवी रात्री दहा वाजता होणार साईबाबांची शेजआरती काल रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव झाल्यानंतर केली गेली.
काल्याचे कीर्तनाने सांगता शिर्डीतील प्रत्येक उत्सवाची सांगता ही साई मंदीरात काल्याचे कीर्तन करत दहीहंडी फोडून केली जाते. आज गोपालकाल्याच्या दिवशी दिवसभर साई समाधीवर गोपाल कृष्णाचा फोटो ठेवून त्याची पुजा केली जाते. आज शुक्रवारी सकाळी 10 ते 12 यावेळेत गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त काल्याचे कीर्तन होवून किर्तनानंतर 12 वाजता दहीहंडी फोडण्यात आली. त्यानंतरच शिर्डीतील विवीध ठिकाणी दहीहंडी फोडण्याच्या उत्साहाला सुरवात झाली. साईबाबांना श्रीकृष्णाचा अवतार मानत या पावन दिवशी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी असंख्य भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली.
हेही वाचा