शिर्डी - संगमनेर येथील प्रांत कार्यालयासमोर उभ्या असलेल्या एका कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. यामुळे याठिकाणी येणाऱया जाणाऱयांची मोठी धावपळ उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. उन्हाच्या कडाक्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील दिपक डेंगळे हे आपल्या कामानिमित्ताने संगमनेर प्रांत कार्यालयात आले असताना त्यांनी आपली कार प्रांत कार्यालयासमोर लावून गेले. त्यानंतर अचानक काही वेळात कारने पेट घेतल्याने रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. प्रांत कार्यालयात स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिलांनी कार पेटलेली पहिल्यानंतर पाणी आणि वाळूचा मारा सुरू केला, मात्र आग मोठ्या प्रमाणात लागली असल्याने संगमनेर अग्निशमन दलाला बोलवण्यात आल्यानंतर आग आटोक्यात आली असून मोठा अनर्थ टळला आहे.
उन्हाच्या कडाक्याने कार पेटली असल्याच अंदाज नागरिकांकडून वर्तवला जात आहे.