ETV Bharat / state

Independance Day 2023: लतादीदींनी गायलेले 'ऐ मेरे वतन के लोगो' गीत अजरामर होऊनही संगीतकार रामचंद्र यांचे नाव दुर्लक्षितच, वाचा स्पेशल रिपोर्ट - C Ramachandra Composed Ae Mere Watan Ke Logo

स्वातंत्र्यदिन असो किंवा प्रजासत्ताक दिन असल्यावर 'ऐ मेरे वतन के लोगो' हे अजरामर गीत नक्कीच कानावर पडते. या अजरामर गीताला लता मंगेशकर यांनी आवाज दिला आहे, तर सी. रामचंद्र अर्थात रामचंद्र नरहरी चितळकर यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे. सी. रामचंद्र हे अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील रहिवासी होते. याच ऐतिहासिक गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे गीत अजारमर झाले खरे, मात्र त्यांचे गाव आणि नाव दोन्हीही दुर्लक्षितच राहीले. याबद्दल सविस्तर आपण या विशेष रिपोर्टमधून जाणून घेवू या.

Independance day 2023
स्वातंत्र्य दिन 2023
author img

By

Published : Aug 15, 2023, 12:31 PM IST

स्वातंत्र्य दिन 2023

अहमदनगर : कोणत्याही देशभक्तीपर प्रसंगी 'ऐ मेरे वतन के लोगो' हे गीत ऐकून उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू अनावर होतात. स्वतः पंडित नेहरूसुद्धा हे अश्रू रोखू शकले नाहीत. आज इतकी दशके उलटूनही हे गीत ऐकल्यावर भारतीयांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाहीत. सर्व भारतीयांच्या मनावर राज्य करणारे हे अजरामर गीत अति दुर्गम भागातील एका मराठी तरुणाने संगीतबद्ध केले आहे. यावर कोणाचाच विश्वास बसत नाही.

अर्थात चित्रपट सृष्टीतील अण्णा : अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावातील रामचंद्र नरहरी चितळकर नावाचा हा तरुण होता. अर्थात चित्रपट सृष्टीतील अण्णा म्हणून त्यांना ओळखले जाते. लहानपणापासूनच रामचंद्रला चित्रपटात नटाची भुमिका करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी रेल्वेत नोकरीत असलेल्या आपल्या वडीलांकडे हट्ट देखील त्यांनी केला. नागपूर येथे त्यांना संगीत शिक्षणासाठी पाठवण्यात आले. त्यानंतर ते थेट मुबंई येथे पोहचले. मात्र यावेळी बॉलीवुडच्या चंदेरी जगात महाराष्ट्रियन व्यक्तीला डावलले जायचे. त्यामु़ळेच त्यांनी चितळकरचा सी घेवून नावात बदल केला. त्यानंतर त्यांची सी रामचंद्र अशी ओळख निर्माण झाली.

स्मारक उभारण्याची मागणी : सन 1962 च्या चिनी सैनिकांच्या हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले होते. यावेळी शहिदांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी कवि प्रदिप रचित आणि लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेल्या गीताला सी. रामचंद्र यांनी कंपोज केले. ज्याप्रमाणे लता दिदींचा आवाज कानावर पडल्यानंतर मन शहाळून जाते, तसेच संगीत हृदयाचा ठोका चुकवते. पुणतांबा गावी सध्या सी रामचंद्र यांचे वंशज राहत आहे. खुद्द पुणतांबेकरांनाच ते ज्ञात नाहीत. आपल्या आजोबांनी देशात ओळख निर्माण केली. मात्र, ज्या गावात त्यांचा जन्म झाला. त्या गावात त्यांना कोणी फारसे ओळखत नाही, याची खंत त्यांचे नातू शंकर चितळकर व्यक्त करतात. महाराष्ट्र सरकारने पुणतांबा गावात रामचंद्र चितळकर अर्थात सी. रामचंद्र यांच्या नावाने एखादा स्तंभ अथवा स्मारक उभारावा, अशी मागणी त्यांचे वंशजांनी स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने केली आहे.

पेटी वाजवण्याचा फार छंद : पुणतांबा गावात त्यांचा अडिचशे वर्षापुर्वीचा अतिशय पुरातन वाडा आहे. याच वाड्यात पहिल्या मजल्यावर सी रामचंद्र यांचा बालपण गेले. त्यांना पेटी वाजवण्याचा फार छंद होता. त्यांची एक जुनी पेटी सध्या या ठिकाणी आहे. काहीशी दुरस्ती करुन 92 वर्षीय पुतणे प्रभाकर चितळतर यांनी संगीत पेटी सुरू केली आहे. ते या ठिकाणी वास्तव्यास आहेत. काकांची आठवण झाल्यावर त्यांच्या पेटीवर 'ऐ मेरे वतन के लोगो' हे गीत वाजवतात. वय अधिक झाल्याने त्यांचा ताल लागत नाही. मात्र, आपण सी. रामचंद्र यांचे वंशज असल्याचा त्यांना अभिमान आहे. प्रभाकर हे लहाणपणी सी. रामचंद्र यांच्या मांडी खांद्यावर खेळले आहेत. स्वांतत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन आला की, 'ऐ मेरे वतन के लोगो' गीताचे बोल कानावर पडल्यानंतर त्यांच्या सर्व आठवणींना उजाळा मिळतो.

हेही वाचा :

  1. Independence Day 2023: राज्यातील 186 कैद्यांची आज कारागृहातून होणार सुटका..जबाबदार नागरिक होण्याचे पोलीस महासंचालकांचे आवाहन
  2. Independence Day 2023: 'बीबी का मकबरा' रंगला तिरंगी रंगात, पाहा व्हिडिओ
  3. Independence Day 2023 : 'या' घोषणा थोर स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे आजही करून देतात स्मरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.