ETV Bharat / state

बस कर्मचाऱ्यांचा संप चालूच, साईभक्तांची प्रवासासाठी अडचण - Sai devotees

परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे यासह अन्य मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाचा फटका शिर्डी येथे साई दर्शनासाठी आलेल्या साई भक्त प्रवाशांना बसला आहे. बस बंद असल्याने प्रवाशांची मोठी अडचण निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे.

शिर्डी बस स्थानक
शिर्डी बस स्थानक
author img

By

Published : Nov 9, 2021, 12:27 PM IST

अहमदनगर (शिर्डी) - राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे यासह अन्य मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाचा फटका शिर्डी येथे साई दर्शनासाठी आलेल्या साई भक्त प्रवाशांना बसला आहे. बस बंद असल्याने प्रवाशांची मोठी अडचण निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे.

साईभक्तांची प्रवासासाठी अडचण

देशासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून साई भक्त दर्शनासाठी शिर्डीत आले

प्रवाशांचा लालपरीवर विश्वास असल्याने तासंतास अनेक प्रवाशी वाट बघत होते. मात्र, बसेस नसल्याने अनेकांना मिळेल त्या खाजगी वाहनाने प्रवास करून घरचा रस्ता धरावा लागला आहे. दरम्यान, दीपावलीच्या सुट्ट्या निमित्त शिर्डीत साई भक्तांची गर्दी वाढली असून देशासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून साई भक्त दर्शनासाठी शिर्डीत आले आहेत. त्यातच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारल्याने बससेवा अनेक ठिकाणी खंडित व विस्कळीत झाली आहे. त्याचा फटका शिर्डीत आलेल्या साईभक्त प्रवाशांना बसल्याचे दिसून येत आहेत.

साईभक्त सुरक्षिततेच्या दृष्टीने लालपरीला पहिली पसंती

शिर्डी बस स्थानकाचा विचार केला तर जागतिक कीर्तीचे तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी शहरात राज्यासह परराज्यांतील महामंडळाच्या सुमारे ४५० बस गाड्यांच्या फेऱ्या असतात. मात्र, संपाच्या पार्श्वभूमीवर मुक्कामी असलेल्या फक्त २७ गाड्यांच्या फेऱ्या माघारी परत गेल्या. प्रवाशांचा लाल परिवार मोठा भरोसा असतो. त्यामुळे प्रवासासाठी शिर्डीत आलेले साईभक्त सुरक्षिततेच्या दृष्टीने लालपरीला पहिली पसंती प्रवासासाठी देत असतात. परंतु, लालपरीच नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.